"चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''चंद्रशेखर''' (जन्म : नाशिक, २९ जानेवारी, १८७१ — मृत्यू : बडोदे, १७ मार... |
(काही फरक नाही)
|
१६:५२, १९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
चंद्रशेखर (जन्म : नाशिक, २९ जानेवारी, १८७१ — मृत्यू : बडोदे, १७ मार्च, १९३७). हे मराठी कवी होते. संपूर्ण नाव चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे. यांचे शिक्षण नाशिक, बडोदे, आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोद्याला वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदे संस्थानाचे ते राजकवी झाले.
चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचाे अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाते.
कवी चंद्रशेखर यांच्या उल्लेखनीय कविता
- उघडं गुपित (कथाकाव्य)
- कविता-रति
- किस्मतपूरचा जमीनदार (कथाकाव्य-१९३६)
- गोदागौरव
- चंद्रिका (काव्यसंग्रह -१९३२)
- चिंतोपंत उदास (मिल्टनच्या इल् पेन्सरोझोचे मराठी रूपांतर)
- रंगराव हर्षे (मिल्टनच्या ल' आलेग्रो ह्या काव्याचे मराठी रूपांतर)