"सविता भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सविता रामकृष्ण भावे (जन्म : मळवली, १४ नोव्हेंबर १९३३; निधन : पुणे, १५...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

००:२५, १८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

सविता रामकृष्ण भावे (जन्म : मळवली, १४ नोव्हेंबर १९३३; निधन : पुणे, १५ ऑक्टोबर २०१३) हे एक मराठी चरित्रलेखक होते. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून स्व्त:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. सविता भावे यांनी तीसहून अधिक चरित्रे लिहिली.

सविता भावे यांचा जन्म लोणावळ्याजवळच्या मळवली येथे झाला होता. शालेय शिक्षण पेणमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. पुण्याच्या लॉ कॉलेजातून ते एल्‌‍एल.बी झाले. त्यानंतर त्यांनी लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केली.

मराठीतील अथश्री, उत्तररंग, प्रेरणा आणि योगक्षेम या खास वृद्धांसाठी असलेल्या मासिकांचे,त्रैमासिकांचे, दिवाळी अंकांचे ते संपादक असत. चरित्र असो वा लेख, मोजक्या शब्दांत आशय मांडण्याची त्यांची प्रभावी शैली होती. लेखनाबरोबरच त्यांनी आपली सामाजिक जाणीवही सतत जागृत ठेवली. ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधण्यात त्यांचा मोठा वाटा होता. माणसे जोडणे हा त्यांचा छंद होता.म्हणूनच त्यांच्या आत्मचरित्राचे नाव ’माणसांतला माणूस’ हे आहे.

साम्यवादी चळवळीत असलेली भावे पुढे सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात रमले. पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

सविता भावे यांनी ज्यांची चरित्रे लिहिली अशा प्रसिद्ध व्यक्ती (कंसात पुस्तकाचे नाव)

अन्य पुस्तके

  • उत्साहपर्व (उत्तररंग या षण्मासिकांतील लेखांचा संग्रह)