"गोपाळ गोविंद मुजुमदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: साधुदास (जन्म सांगली, :१९८३; मृत्यू : ६ एप्रिल१९४८) (पूर्ण नाव गोपाळ ... |
(काही फरक नाही)
|
१५:१५, १७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
साधुदास (जन्म सांगली, :१९८३; मृत्यू : ६ एप्रिल१९४८) (पूर्ण नाव गोपाळ गोविंद मुजुमदार-पाटणकर) हे एक मराठी कवी आणि कादंबरीकार होते.
साधुदास यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीत आणि पुढचे फर्ग्युसन महाविद्यालयात. कॉलेजशिक्षण अर्धवट टाकून ते सांगलीला गेले आणि नोकरी करू लागले.
साधुदास या नावाने त्यांनी काव्यरचना आणि अन्य लिखाण केले आहे. रामकथा चार भागांत सांगण्याच्या उद्देशाने त्यांनी ’विहारे’ नावाची काव्यरचना केली. पण ते फक्त तीनच विहार पूर्ण करू शकले.
साधुदास यांच्या ’पौर्णिमा’ या कादंबरीत शनिवारवाड्याचे यथातथ्य वर्णन आले आहे.
साधुदास यांनी लिहिलेली पुस्तके
- काव्ये
- गृहविहार (काव्य)
- रणविहार (काव्य)
- वनविहार (काव्य)
- स्तोत्रे:-
- कृष्णालहरी
- भीमशती
- रामशती
- सद्गुरुशती
- सीताशती
- स्फुटकाव्ये :-
- निर्माल्यसंग्रह भाग १, २.
- महायुद्घाचा पोवाडा
- कादंबऱ्या :-
- पौर्णिमा-पूर्वरात्र
- पौर्णिमा-उत्तररात्र
- मराठेशाहीचा वद्यपक्ष : प्रतिपदा-पूर्वरात्र व उत्तररात्र
- मराठेशाहीचा वद्यपक्ष : द्वितीया पूर्वरात्र व उत्तररात्र
- अन्य पुस्तके :-
- मराठीची सजावट : भाग १, २
- बुद्घिबळाचा मार्गदर्शक