"गोविंद पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: गो.पु. देशपांडे (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : २ ऑग... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२१:५९, १६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
गो.पु. देशपांडे (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : १६ ऑक्टोबर २०१३)हे एक मराठी नाटककार होते.
प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात गो.पु. देशपांडे यांनी विचारनाट्याची धारा पहिल्यांदा निर्माण करण्याचा यत्न केला. राजकीय जाणिवा ही या लेखनामागची प्रेरणा आहे. गो.पु. देशपांडे हे अनेक राजकीय चळवळींचे साक्षीदार होते; पूर्वी काहीसे संबंधितही होते. जाणतेपणाने त्यांनी राजकीय चळवळींचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्या नाटकातील विचारांना आणि आशयाला एक प्रकारची विश्वासार्हता होती.
गो.पु. देशपांडे यांनी लिहिलेली नाटके
- अंधारयात्रा
- अस्सा नवरा सुरेख बाई
- उध्वस्त धर्मशाळा
- एक वाजून गेला आहे
- चाणक्य विष्णुगुप्त
- मामकापाण्डवाश्चैव
- रस्ते
- सत्यशोधक