"इंद्रायणी सावकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इंद्रायणी प्रभाकर सावकार (जन्म : जून २६, इ.स. १९३४) या मराठीतील ए...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ४: ओळ ४:

==शिक्षण==
==शिक्षण==
इंद्रायणी पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून १९४९मध्ये मॅट्रिक झाल्या. त्या परीक्षेत त्यांना संकृतमध्ये युनिव्हर्सिटीत पहिली आल्याबद्दल [[जगन्नाथ शंकरशेठ]] पारितोषिक आणि इंग्रजीत पहिली आल्याबद्दल [[दादाभाई नवरोजी]] पारितोषिक मिळाले. १९५३मध्ये इंद्रायणी, पुणे विद्यापीठातून बी.ए.(ऑनर्स), आणि १९५५मध्ये पॅरीस विद्यापीठातून डी.एल.( Doctorat es Lettres) झाल्या.
इंद्रायणी पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून १९४९मध्ये मॅट्रिक झाल्या. त्या परीक्षेत त्यांना युनिव्हर्सिटीत संस्कृतमध्ये पहिली आल्याबद्दल [[जगन्नाथ शंकरशेठ]] पारितोषिक आणि इंग्रजीत पहिली आल्याबद्दल [[दादाभाई नवरोजी]] पारितोषिक मिळाले. १९५३मध्ये इंद्रायणी, पुणे विद्यापीठातून बी.ए.(ऑनर्स), आणि १९५५मध्ये पॅरीस विद्यापीठातून डी.एल.( Doctorat es Lettres) झाल्या.

==लग्न==
==लग्न==
लग्नानंतर इंद्रायणी साठे या इंद्रायणी सावकार झाल्या. त्यांचे पती प्रभाकर सावकार हे एम.एस्‌‍सी. पीएच.डी आहेत. या जोडप्याला लग्न होऊन सासरी गेलेल्या चार मुली आहेत. इंद्रायणी सावकार यांनी कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून सुमारे ४० मराठी पुस्तके लिहिली आहेत. मराठी मासिकांतून आणि त्यांच्या दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असलेल्या मराठी लघुकथा हे त्या अंकांचे भूषण असे.
लग्नानंतर इंद्रायणी साठे या इंद्रायणी सावकार झाल्या. त्यांचे पती प्रभाकर सावकार हे एम.एस्‌‍सी. पीएच.डी आहेत. या जोडप्याला चार मुली आणि नऊ नातवंडे (करिष्मा व समीरा संघवी, देविका व आकाश नाडकर्णी, तन्वी व निहाल श्हा आणि सिरन, अलेक्सन व कॅप्रिअल सिनार) आहेत. इंद्रायणी सावकार यांनी कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून सुमारे ४० मराठी पुस्तके लिहिली आहेत. मराठी मासिकांतून आणि त्यांच्या दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असलेल्या मराठी लघुकथा हे त्या अंकांचे भूषण असे.

इंद्रायणी सावकार यांनी काही वर्षे [[वसंतदादा पाटील ]] यांच्या पत्नी [[शालिनीबाई पाटील]] यांच्या खासगी सेक्रेटरीचे काम केले आहे. इंद्रायणींचे पती प्रभाकर सावकार हे माजी खासदार [[प्रकाशबापू पाटील]] यांचे सहकारी होते. इंद्रायणींचा या निमित्ताने मराठी राजकारणी लोकांशी संबंध आला. त्यांच्या कादंबऱ्यांतून येणारी राजकारणी पात्रे ही त्या अनुभवांवरच बेतलेली असावीत. इ.स. १९८९पासून पुढे अनेक वर्षे इंद्रायणी सावकार [[बाळ ठाकरे]] यांच्या दैनिक ’सामना’च्या उपसंपादक होत्या.

स्वत: लेखिका असल्याने त्या इतर स्त्रियांनाही लेखनासाठी उत्तेजन देतात. इंद्रायणी सावकार यांनी, सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप गावातील शेतकरी महिला वैशाली पाटील यांना लिहिते केले. त्यांचा ’ठिबक सिंचना’वरचा लेख इंद्रायणी सावकारांनी वर्तमानपत्रात छापून आणला, आणि त्यांना ५०० रुपये मानधन मिळवून दिले. आज वैशाली पाटील यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वैशाली पाटलांवर इंद्रायणींनी ’शेतावर राहणारी लेखिका’ हा लेख लिहिला होता.

इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे.

==इंद्रायणी सावकार यांनीं लिहिलेली मराठी आणि इंग्रजी पुस्तके==
==इंद्रायणी सावकार यांनीं लिहिलेली मराठी आणि इंग्रजी पुस्तके==
ओळ १४: ओळ २०:
* मृगया (कादंबरी)
* मृगया (कादंबरी)
* रसवंती (पाकशास्त्र)
* रसवंती (पाकशास्त्र)
* वारस (राजकीय पार्श्वभूमीवरची कादंबरी
* वाघीण (एका वाघिणीसारख्या आदिवासी स्त्रीची कहाणी-कादंबरी)
* Our Inheritance Of Spirituality (माहितीपर)
* Our Inheritance Of Spirituality (माहितीपर)
* Purple Grass (कथासंग्रह)
* Purple Grass (कथासंग्रह)
* She, the Accused (कादंबरी-इ.स.१९९८). ही कादंबरीचे ’क्रॉसवर्ड’ने वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी विचारात घेतली होती.
* She, the Accused (कादंबरी-इ.स.१९९८). ही कादंबरीचे ’क्रॉसवर्ड’ने वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी विचारात घेतली होती.
* The Men from Sun(कादंबरी-इ.स.२०००)
* The Men from Sun(कादंबरी-इ.स.२०००)

* The Splendour of Ganesh Worship (माहितीपर - इ.स.२००३)
* The Splendour of Ganesh Worship (माहितीपर - इ.स.२००३)
* Stories of Sages (व्यक्तिचित्रण)
* Weeds (कथासंग्रह)
* Weeds (कथासंग्रह)

(अपूर्ण)
(अपूर्ण)

{{DEFAULTSORT:सावकार, इंद्रायणी प्रभाकर}}

[[वर्ग:मराठी लेखक]]

२२:५२, २५ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

इंद्रायणी प्रभाकर सावकार (जन्म : जून २६, इ.स. १९३४) या मराठीतील एक खुसखुशीत लिखाणासाठी प्रख्यात असलेल्या लेखिका आहेत.

त्यांच्या वडिलांचे नाव त्रिंबक साठे आणि आईचे मनोरमा साठे. त्यांचे आजोबा रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब साठे हे वकील होते आणि आईचे वडील धर्मानंद कोसंबी ऊर्फ बापू हे संस्कृतचे प्रकांड पंडित आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. या दोघांमुळेच इंद्रायणींना संस्कृतची गोडी लागली.

शिक्षण

इंद्रायणी पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून १९४९मध्ये मॅट्रिक झाल्या. त्या परीक्षेत त्यांना युनिव्हर्सिटीत संस्कृतमध्ये पहिली आल्याबद्दल जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक आणि इंग्रजीत पहिली आल्याबद्दल दादाभाई नवरोजी पारितोषिक मिळाले. १९५३मध्ये इंद्रायणी, पुणे विद्यापीठातून बी.ए.(ऑनर्स), आणि १९५५मध्ये पॅरीस विद्यापीठातून डी.एल.( Doctorat es Lettres) झाल्या.

लग्न

लग्नानंतर इंद्रायणी साठे या इंद्रायणी सावकार झाल्या. त्यांचे पती प्रभाकर सावकार हे एम.एस्‌‍सी. पीएच.डी आहेत. या जोडप्याला चार मुली आणि नऊ नातवंडे (करिष्मा व समीरा संघवी, देविका व आकाश नाडकर्णी, तन्वी व निहाल श्हा आणि सिरन, अलेक्सन व कॅप्रिअल सिनार) आहेत. इंद्रायणी सावकार यांनी कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून सुमारे ४० मराठी पुस्तके लिहिली आहेत. मराठी मासिकांतून आणि त्यांच्या दिवाळी अंकांतून प्रकाशित होत असलेल्या मराठी लघुकथा हे त्या अंकांचे भूषण असे.

इंद्रायणी सावकार यांनी काही वर्षे वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीबाई पाटील यांच्या खासगी सेक्रेटरीचे काम केले आहे. इंद्रायणींचे पती प्रभाकर सावकार हे माजी खासदार प्रकाशबापू पाटील यांचे सहकारी होते. इंद्रायणींचा या निमित्ताने मराठी राजकारणी लोकांशी संबंध आला. त्यांच्या कादंबऱ्यांतून येणारी राजकारणी पात्रे ही त्या अनुभवांवरच बेतलेली असावीत. इ.स. १९८९पासून पुढे अनेक वर्षे इंद्रायणी सावकार बाळ ठाकरे यांच्या दैनिक ’सामना’च्या उपसंपादक होत्या.

स्वत: लेखिका असल्याने त्या इतर स्त्रियांनाही लेखनासाठी उत्तेजन देतात. इंद्रायणी सावकार यांनी, सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप गावातील शेतकरी महिला वैशाली पाटील यांना लिहिते केले. त्यांचा ’ठिबक सिंचना’वरचा लेख इंद्रायणी सावकारांनी वर्तमानपत्रात छापून आणला, आणि त्यांना ५०० रुपये मानधन मिळवून दिले. आज वैशाली पाटील यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वैशाली पाटलांवर इंद्रायणींनी ’शेतावर राहणारी लेखिका’ हा लेख लिहिला होता.

इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे.

इंद्रायणी सावकार यांनीं लिहिलेली मराठी आणि इंग्रजी पुस्तके

  • बाळा-बापू (कादंबरी)
  • भारतीय संस्कृतीचे शिल्पकार : ५७ ऋषींच्या महान गोष्टी (बालसाहित्य)
  • मृगया (कादंबरी)
  • रसवंती (पाकशास्त्र)
  • वारस (राजकीय पार्श्वभूमीवरची कादंबरी
  • वाघीण (एका वाघिणीसारख्या आदिवासी स्त्रीची कहाणी-कादंबरी)
  • Our Inheritance Of Spirituality (माहितीपर)
  • Purple Grass (कथासंग्रह)
  • She, the Accused (कादंबरी-इ.स.१९९८). ही कादंबरीचे ’क्रॉसवर्ड’ने वर्षातल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी विचारात घेतली होती.
  • The Men from Sun(कादंबरी-इ.स.२०००)
  • The Splendour of Ganesh Worship (माहितीपर - इ.स.२००३)
  • Stories of Sages (व्यक्तिचित्रण)
  • Weeds (कथासंग्रह)

(अपूर्ण)