Jump to content

"विद्रोही सांस्कृतिक चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळ नेमकी केव्हापासून सुरू ...
(काही फरक नाही)

१४:०९, १८ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळ नेमकी केव्हापासून सुरू आहे, हे सांगणे कठीण आहे. पण बहुधा १९९७साली प्रा. बाबूराव बागूल यांनी या चळवळीला संस्थेचे रूप दिले असावे. ते संस्थेचे पहिले अध्यक्ष असावेत. मात्र, पहिले उपाध्यक्ष प्रा डॉ. बाबुराव गुरव होते. १९९९ साली भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबूराव बागूल आणि ११व्या संमेलनाचे अध्यक्ष बाबूराव गुरव होते.

महाराष्ट्रातील पहिल्या ग्रंथकार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे हे होते. त्यांनी सन्मानाने जोतिराव फुले यांना संमेलनाचे निमंत्रण पाठविले असता जोतिरावांनी "या घालमोड्या दादांनी दिलेल्या निमंत्रणास आम्ही नकार देत आहोत" असे उत्तर दिले होते. त्यानंतरच केव्हातरी महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे बीज रोविले गेले, आणि अधिकृत मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहण्याची प्रथा सुरू झाली. २००२साली मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण आल्यावर डॉ. नदाफ यांनीही "या घालमोड्या दादांनी दिलेल्या निमंत्रणास आम्ही नकार देत आहोत. अखिल भारतीय साहित्य महमंडळाने हाकामारीचा उद्योग थांबवावा" असे ’बाणेदार’ उत्तर दिले होते.

ज्या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते त्याच दिवशी आणि शक्यतो त्याच गावात विद्रोही साहित्य संमेलन भरविण्याची परंपरा इ.स.१९९९ सालापासून सुरू आहे.

ही विद्रोही सांस्कृतिक चळवळ नेमकी कोण चालवते ते अस्पष्ट आहे. पण २००२ साली अमरावतीला भरलेल्या त्या ४थ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नदाफ यांनी त्यांच्या भाषणात "विद्रोही चळवळ ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, शेतकरी कामकरी पक्ष, भारतीय रिपाब्लिकन पार्टी, बहुजन महासंघ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इत्यादी विविध सांस्कृतिक पक्षांची आघाडी आहे” असे म्हटले होते. असे असले त्यांचे म्हणणे तितकेसे खरे नसावे. अन्य विद्रोहीवाल्यांना ते पटले नसणार.


(अपूर्ण)