Jump to content

"टिळक महाराष्ट्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (स्थापना इ.स. १९२१) हे पुणे शहरातील एक अ...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

१८:१८, २६ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (स्थापना इ.स. १९२१) हे पुणे शहरातील एक अभिमत विद्यापीठ आहे. इ.स.१९८७मध्ये भारत सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. हे विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संकृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो.

पदाधिकारी

कुर्तकोटीचे शंकराचार्य विद्याशंकर भारती हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यानंतर हे पद चिं.वि. वैद्य, दत्तो वामन पोतदार, बापूजी अणे, आदी विद्वानांकडे होते.

टिळक विद्यापीठाशी संलग्न संस्था

  • टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगाव. ही संस्था ’माध्यमिक शालान्त परीक्षे’च्या समकक्ष असलेली ’सर्वोदय’परीक्षा घेते.
  • दूरस्थ शिक्षण विभाग, गुलटेकडी (पुणे)
  • टिळक विद्यापीठाच्या अन्य शाखा - चिपळूण, ठाणे बेलापूर, सांगली आणि सोलापूर