Jump to content

"लीला अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव (जन्म: प...
(काही फरक नाही)

०९:३६, २५ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव (जन्म: पंढरपूर, १० जून १९३२) या पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली आणि अर्धमागधी यांचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका आहेत. कै. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांच्या या पत्नी.

शिक्षण

  • १९४८, मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक (शाळा हुजूरपागा-पुणे)
  • १९५०, इंटर आर्ट्‌स, स.प.महाविद्यालय-पुणे. लोकमान्य टिळक संस्कृत शिष्यवृत्ती
  • १९५२, बी.ए., पुणे विद्यापीठ (कॉलेज-स.प.महाविद्यालय-पुणे). विषय संस्कृत-मराठी. प्रा. करमरकर पारितोषिक
  • १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक
  • १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती