Jump to content

लीला अर्जुनवाडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव ( १० जून १९३२ (पंढरपूर) - ०५ एप्रिल २०२२ (पुणे) ), या पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली आणि अर्धमागधी यांचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका होत्या. कै. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांच्या या पत्नी. डॉ. मिहिर अर्जुनवाडकर हे त्यांचे सुपुत्र.

शिक्षण

[संपादन]
  • १९४८, मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक (शाळा हुजूरपागा-पुणे)
  • १९५०, इंटर आर्ट्‌स, स.प.महाविद्यालय-पुणे. लोकमान्य टिळक संस्कृत शिष्यवृत्ती
  • १९५२, बी.ए., पुणे विद्यापीठ (कॉलेज-स.प.महाविद्यालय-पुणे). विषय संस्कृत-मराठी. प्रा. करमरकर पारितोषिक
  • १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक
  • १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती

अध्यापनकार्य

[संपादन]

भूषविलेली पदे

[संपादन]
  • इ.स.१९७३पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत विभाग-प्रमुख
  • १९८०-८३ ग्रंथालय प्रमुख
  • त्याच कॉलेजात सुमारे २५ वर्षे संस्कृत संघटनाप्रमुख. या काळात अनेक नामवंतांच्या व्याख्यानांचे आणि संस्कृतसंबंधी अन्य कार्यक्रमांचे संयोजन
  • पुणे विद्यापीठातील संस्कृत अभ्यास मंडळाच्या सभासद

संपादन

[संपादन]

उपक्रम

[संपादन]
  • संगीत साहित्य, अभिनय, यांच्याशी संबंधित परिसंवाद, मुलाखती आदी कार्यक्रमांत सहभाग.

गौरवगंथ

[संपादन]

प्रा. लीला अर्जुनवाडकर यांच्या ७७व्या जन्मदिनी त्यांच्या निवडक लेखांचा ’लीलाकमलपत्राणि’ नावाचा गौरवग्रंथ त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी अर्पण केला.

  • प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या नाटकांमधून भूमिका
  • आकाशवाणीवर ४०-४५ वर्षे दिलेली भाषणे
  • आकाशवाणीवर संस्कृत श्रुतिका सादर करणे
  • संस्कृत नाट्यस्पर्धांत परीक्षक म्हणून काम
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, आदी संस्थांच्या नियामकमंडळावर काम
  • ज्ञानप्रबोधिनी या शाळेत संस्कृत वाचनवर्ग चालविणे
  • भरताच्या नाट्यशास्त्रावर अभ्यासवर्ग चालवणे
  • चर्चासत्रांत आणि सार्वजनिक सभांत दिलेली मराठी भाषणे (सुमारे ४०), वगैरे, वगैरे.

लेखन

[संपादन]