Jump to content

"हत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:

{{जीवचौकट
| नाव = हत्ती
| चित्र = Elephant_near_ndutu.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक = An African Bush Elephant near the border of the [[Serengeti]] and [[Ngorongoro Conservation Area]] in [[Tanzania]].
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| subphylum = [[पृष्ठवंशी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[प्रोबोस्काइड]]
| superfamilia = [[एलेफंटॉइड]]
| कुळ = '''एलेफंटाइड'''
| कुळ_अधिकारी= [[जॉन एडवर्ड ग्रे]], १८२१
| subdivision_ranks = [[उपकुळ]]
| subdivision =
* See [[Elephant#Family classification|Classification]]
}}

भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात. हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो. येतो. भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.

१६:५४, १२ जुलै २०१३ ची आवृत्ती

हत्ती
An African Bush Elephant near the border of the Serengeti and Ngorongoro Conservation Area in Tanzania.
An African Bush Elephant near the border of the Serengeti and Ngorongoro Conservation Area in Tanzania.
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
Subphylum: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: प्रोबोस्काइड
Superfamily: एलेफंटॉइड
कुळ: एलेफंटाइड
जॉन एडवर्ड ग्रे, १८२१
उपकुळ

भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात. हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो. येतो. भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावे लागते. जंगलात लाकडे कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडे कापून लाकडाचे ओंडके बनवतात. शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात. वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर किंवा प्रवाहाबरोबर खाली वाहत जातात. शिकवलेले हत्ती गाड्या ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. हत्तींवर बसून लढाया करत. हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत. तसंच अंबारीतून मिरवणुका काढत. हत्तींना शिकवून सर्कशीत त्यांच्याकडून कामे करवून घेतात. ते सर्कसमध्ये अनेक प्रकारची कामे करतात. हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंताना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटया, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडया, बटने इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.

हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असं म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.

हत्तीण २२ महिन्यांपर्यंत गाभण राहते. एका वेळेस तिला एकच पिल्‍लू होते. क्वचित दोनदेखील होतात. नुकत्याच जन्मलेल्या पिल्लाचे वजन ९० किलोग्रॅमच्या आसपास असून त्याची उंची सुमारे एक मीटर असते. पिलू जन्मल्याबरोबर लगेचच चालू लागते आणि कळपात सामील होते. हत्ती मुख्यत: गवत, झाडपाला, पाने, फळे, फुले खातात. ऊस हे हत्तीचे आवडीचे खाद्य. त्याचबरोबर नारळ, केळीदेखील त्याला आवडतात. हत्ती सर्व खाद्यपदार्थ सोंडेने उचलून तोंडात धरतो. या लांब सोंडेचा त्याला हातासारखा उपयोग होतो. हत्तींना पाण्यात डुंबायला फार आवडते. पाण्यात असतानादेखील ते सोंडेत पाणी घेऊन फवाऱ्यासारखे डोक्यावर सोडतात. हत्तीची छोटी पिले कित्येकदा सोंडेत पाणी घेऊन एकमेकांवर फवारण्याचा खेळ खेळतात. सोंड हे हत्तीचे नाक आहे. ते सोंडेने श्वासोच्छवास करतात. हत्तीची सोंड आणि कान फारच मोठे असतात. त्यामुळे हत्तीला त्याच्या शत्रूच्या अंगाचा वास लांबूनच येतो. तसेच शत्रूच्या हालचालीमुळे झालेला आवाजही त्यांना दुरूनच ऐकू येतो. त्यामुळे शत्रू दूर असला तरी त्याची चाहूल हत्तीला लागते. हत्ती ७०-८० वर्षे जगतो.