Jump to content

"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्य...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१८:५०, २८ जून २०१३ ची आवृत्ती

मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले ष्ट आणि ष्ठ हे प्रत्यय आहेत.यांच्या उपयोगाविषयी ही माहिती : संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' हा प्रत्यय comparative degreeसाठी आणि ’तम’ हा superlative degreeसाठी लागतो. उदा० उच्च, उच्चतर (तुलनेने अधिक उच्‍च) आणि उच्चतम (सर्वात अधिक उच्च). इंग्रजीमध्ये यासाठी अनुक्रमे 'er' आणि 'est' हे प्रत्यय लागतात. उदा० high, higher आणि highest. संस्कृतमधून मराठीत न आलेल्या किंवा तद्भव(बदल होऊन आलेल्या) शब्दांसाठी असे प्रत्यय मराठी भाषेत नाहीत. इच्छित अर्थ मिळविण्यासाठी मराठीत ’अधिक’ आणि ’सर्वात जास्त’ हे किंवा अशा अर्थाचे शब्द वापरले जातात. उदा० उंच, अधिक उंच आणि सर्वात (जास्त) उंच.

पण संस्कृतमधून मराठीत आलेले तत्सम शब्द जसेच्या तसे आल्याने त्यांच्यात हे प्रत्यय लावून बनलेले शब्द मराठीत आहेत.

मराठी विशेषणांना ’ष्ठ’ हा superlative degree दाखविण्यासाठी वापरला जातो. हा प्रत्यय लागलेले शब्द :

  • कनिष्ठ (सर्वात खालचा; रूढार्थाने खालच्या पदावरचा) (धाकटा)
  • गर्विष्ठ (सर्वात जास्त गर्व करणारा; रूढार्थाने गर्व करणारा)
  • ज्येष्ठ (सर्वात मोठा; रूढार्थाने वयाने मोठा) (महत्त्वाचा हिंदू महिना)
  • ज्येष्ठा (आकाशातील एक सर्वात मोठे वाटलेले नक्षत्र)
  • ज्येष्ठागौरी (ज्येष्ठ महिन्यात घरांत बसणाऱ्या गौरी)
  • ज्येष्ठी (ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा)
  • घनिष्ठ (सर्वात अधिक घट्ट; खूप घट्ट)
  • वरिष्ठ (सर्वात वरचा; रूढार्थाने वरच्या पदावरचा)
  • श्रेष्ठ (सर्वात अधिक श्रेयस; रूढार्थाने वरच्या दर्जाचा)
  • श्रेष्ठी (सावकार

(अपूर्ण)