"करूळचा मुलगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''करूळचा मुलगा''' हे, मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक यांचे आत्मचरित्... |
(काही फरक नाही)
|
१२:०४, २४ मे २०१३ ची आवृत्ती
करूळचा मुलगा हे, मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक यांचे आत्मचरित्र आहे. दारिद्ऱ्याशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वत:चे जीवन यशस्वी करणाऱ्या लेखकाने सांगितलेली ही जीवनकथा आहे.
या पुस्तकात कर्णिक यांनी स्वतःचे बालपण, आईवडिलांचे प्रेम, पूर्वजांच्या पुण्याईबद्दलचा अभिमान आणि करूळ गावातील माणसे व त्यांचे जीवनव्यवहार यांविषयी वाटणारी अतीव आत्मीयता यांवर लिहिले आहे.
आत्मचरित्राचा उत्तरार्ध लेखकाच्या साहित्यसेवेचा, समाजसेवेचा व संस्थात्मक कार्याचा तपशील सांगणारा आहे. त्यांनी काढलेला काचेचा कारखाना, करूळच्या शाळेचा आणि वनराईचा त्यांचा उपक्रम, आमराईचा अनुभव, जमीनदारीचे प्रकरण, रत्नागिरीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद , कोमसापची उभारणी , केशवसुतांच्या स्मारकाची निर्मिती इत्यादी प्रकरणांच्या रंजक व उद्बोधक हकिकती त्यांनी कथन केल्या आहेत.
कळत नकळत होणारे मनोव्यापार, मुखवटयामागचे चेहरे, मानवी वर्तनामागील अहंता व स्वार्थभावना, माणसांच्या आचारविचारांतील विसंगती या सर्वांचे भेदक दर्शन करूळचा मुलगा या आत्मचरित्रातून घडते. सर्वार्थाने हे आत्मचरित्र सांस्कृतिक स्वरूपाचा दस्तऐवज झाले आहे.
पहा : मधु मंगेश कर्णिक