Jump to content

"सत्त्वशीला सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सत्त्वशीला विठ्ठल सामंत (जन्म : मुंबई २५ मार्च १९४५; मृत्यू : पुणे, ...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१७:०९, ५ मे २०१३ ची आवृत्ती

सत्त्वशीला विठ्ठल सामंत (जन्म : मुंबई २५ मार्च १९४५; मृत्यू : पुणे, १ मे २०१३) या मराठीतील एक भाषाशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे माहेरचे नाव सत्त्वशीला परशुराम देसाई. आईचे नाव सुनंदा देसाई. मुंबईतूनच सत्त्वशीलाबाईंनी संस्कृत-मराठी घेऊन बी.ए. केले. आणि त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एल्‌एल.बी आणि डिप्लोमा इन लिन्ग्विस्टिक्स(भाषाशास्त्र पदविका) हे अभ्यासक्रम पूर्ण केले. महाराष्ट्र सरकारच्या भाषा संचालनालयात त्या प्रथम अनुवादक आणि नंतर उप-संचालक होत्या. इ.स. १९८६मध्ये त्यांनी प्रकृति-अस्वास्थ्याच्या कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्या आपल्या पतीबरोबर पुण्यात ऑक्टोबर १९९५मध्ये आल्या व स्थायिक झाल्या.

निवृत्तीनंतर

निवृत्तीनंतर त्यांनी भाषाविषयक विविध बौद्धिक उपक्रमांत भाग घेण्यास सुरुवात केली. ’मराठी शुद्धलेखन’ या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांनी ’रुची’, ’भाषा आणि जीवन’ या नियतकालिकांतून आणि मराठी वृत्तपत्रांतून लेख लिहिले, वाचकांच्या पत्रव्यवहारांत त्यांनी आपले विचार मांडले आणि इतरांचे गैरसमज दूर करून त्यांनी त्यांच्या मतांमधील चुकीच्या कल्पना दुरुस्त करायचा प्रयत्न केला. ’मानस-सरोवर’ हे गेल्या काही वर्षांपासून चुकीने मान-सरोवर असे लिहिले जात असल्याबद्दल त्यांनी लेख लिहून व भारत सरकारशी पत्रव्यवहार करून आपली मते ठामपणे मांडली. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी सत्त्वशीला सामंत यांचा मुंबईतील डॉ. श्रीखंडे यांच्यावर एक सुरेख ललित लेख छापून आला होता.

सत्त्वशीला सामंत यांचे प्रकाशित साहित्य

  • ज्ञानकोशकार श्री.व्यं. केतकर यांच्या कन्या कै. वीरा शर्मा यांच्या मूळ इंग्रजी कथांचा मराठी अनुवाद-आहेर, हा ग्रंथाली प्रकाशनाने १९९७ साली प्रकाशित केला.
  • ’व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’ हे पुस्तक १९९९ साली गोकुळ मासिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या असून त्याला ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चा पुरस्कार मिळाला आहे.
  • पुण्याच्या डायमंड प्रकाशनाने प्रकाशित केलेला ’शब्दानंद’ हा डेमी-साइझ कागदावर छापलेला नऊशे पानी शब्दकोश मार्च २००७मध्ये प्रकाशित झाला. इंग्रजी भाषेत वापरल्या जाणाऱ्या आणि मराठीत आवश्यक असलेल्या अनेक तांत्रिक संज्ञांना या कोशात मराठी आणि हिंदी पर्याय दिले आहेत. शब्दकोशात २७००० इंग्रजी आणि ३०,००० हिंदी-मराठी शब्द आहेत. हा सर्व कोश सत्त्वशीलाबाईंनी एकहाती केला. ’मोरो केशव दामले’यांच्यानंतर एवढे मोठी एकहाती काम क्वचितच कुणी केले असेल. या शब्दकोशाला महाराष्ट्र सरकारने पुरस्कार देऊन गौरवले आहे.

मृत्यू

१ मे २०१३ रोजी रात्री हृदयक्रिया बंद पडून सत्त्वशीला सामंत यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने मराठी शुद्धलेखनाच्या जुन्या नियमांसाठी लढणारा अखेरचा योद्धा अस्तंगत झाला.  ;