"मराठीतील व्याकरण ग्रंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीत तेराव्या शतकापासून व्याकरणे लिहायची प्रथा पुढे खंडित झा...
(काही फरक नाही)

२१:११, ४ मे २०१३ ची आवृत्ती

मराठीत तेराव्या शतकापासून व्याकरणे लिहायची प्रथा पुढे खंडित झाली. त्यानंतर ब्रिटिश राजकर्त्यांची गरज म्हणून इंग्रजी भाषेत लिहिलेली काही व्याकरणे इंग्रज लेखकांनी लिहिली. आणि त्यानंतर अस्सल मराठी व्याकरणे किंवा व्याकरणविषयक लेख प्रकाशित व्हावयास सुरुवात झाली. मराठीतल्या व्याकरणग्रंथांचा हा गोषवारा :-

  • महानुभावीय लेखक भीष्माचार्य यांचे ’पंचवार्तिक’ नावाचे व्याकरण
  • भास्करभट्ट बोरीकर यांचे ’महाराष्ट्र भाषाभ्यास अथवा सुभाष्य’ नावाचे व्याकरण
  • आनेराज व्यास यांचे द्वात्रिशलक्ष्णरत्नाकर’ नावाचे व्याकरण
  • इंग्रज लेखक :- फादर स्टीफन्स, विल्यम कॅरी, महंमद इब्राहिम मखबा, स्टीव्हन्सन, बॅलेन्टाइन, बेलर्स व आसखेडकर, * रेव्हरंड नवलकर वगैरेंची इंग्रजीतून लिहिलेली मराठी व्याकरणे.
  • दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’
  • गंगाधरशास्त्री फडके यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’
  • वेंकटमाधव यांचे ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’कार नामक संस्कृतमध्ये लिहिलेले आणि मद्रास येथून प्रकाशित झालेले व्याकरण.
  • कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे व्याकरण
  • कृष्णशास्त्री गोडबोले म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग गोडबोले यांचे ’मराठी भाषेचे नवीन व्याकरण’.
  • खेर यांचे व्याकरण.
  • रा.भि. जोशी यांचे ’प्रौढबोध’ नावाचे व्याकरण>
  • जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके यांचेकडून सरकारने लिहून घेतलेले शालेय व्याकरण.
  • आगरकर यांचे व्याकरण.
  • रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे ’सुबोधव्याकरण’.
  • रावजीशास्त्री गोडबोले यांचे मराठी भाषेचे मध्यम व्याकरण.
  • बाळकृष्ण विष्णू भिडे यांचे व्याकरण.
  • बाळशास्त्री जांभेकर यांचे ’बालव्याकरण’.
  • गंगाधरशास्त्री रा. टिळक यांचे ’लघुव्याकरण’.
  • गोपाळ जिवाजी केळकर यांचे व्याकरण.
  • वागळे यांचे व्याकरण.
  • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे ’श्रीज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण’.
  • मोरो केशव दामले यांची ’शास्त्रीय मराठी व्याकरण’