"गोविंद बाबाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''गोविंद बाबाजी जोशी''' (जन्म : इ.स. १९२१;मृत्यू १ मे १९०६) हे महाराष्ट...
खूणपताका: असभ्यता ?
(काही फरक नाही)

२२:२७, २ मे २०१३ ची आवृत्ती

गोविंद बाबाजी जोशी (जन्म : इ.स. १९२१;मृत्यू १ मे १९०६) हे महाराष्ट्रातील आद्यय हिंदू मिशनरी होते. त्यांचे फारम कमी शालेय शिक्षण वसई येथील मराठी झाले होते. त्यानंतर त्यांनी घरी राहूनच वाचन-लेखनाचा परिपाठ ठेवला.

गोविंद आबाजी जोशी हे विचाराने सुधारक होते. विधवाविवाह त्यांना मान्य होता. त्यांनी लिहिलेल्या ’हिंदू लोकांस विनंति’ व ’वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ’ या दोन, बालविवाह आणि वृद्धांचे विवाह यांपासून होणाऱ्या अनर्थाची कल्पना देणाऱ्या पुस्तकांवरून त्यांची विचारधारा स्पष्ट होते.

देशातील अडाणी जनतेला तिच्या दुःखाची आणि हक्कांची जाणीव करून द्यावी, आणि सुस्थितीचा मार्ग दाखवावा या उद्देशाने गोविंद बाबाजी जोशी यांनी हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांतून प्रवास करून देशाभिमान, नीती, परोपकार, सत्य आदी विषयांवर ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे भाषणे दिली. प्रवासात भेट दिलेल्या स्थळांची ऐतिहासिक, धार्मिक सामाजिक अशी साद्यंत माहिती जमवून ती जोशींनी पुस्तकरूपाने प्रकाशित केली. त्यांच्या ’गेल्या तीस वर्षापूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी)’ या प्रवासवर्णनात प्रथमच रोजनिशी पद्धतीचा वापर केलेला आहे. ही रोजनिशी म्हणजे १९व्या शतकातील समाज कसा होता याचे चित्रच आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांत १८८७ सालचे काँग्रेसचे मद्रास येथील अधिवेशन, १८९४ सालचे लाहोरचे अधिवेशन आणि १८९८ सालची राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची सुसंगत माहिती दिलेली आढळते.

गोविंद बाबाजी जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • गेल्या तीस वर्षांपूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकीकत (१८९६)
  • थोडासा प्रवास - पुणे ते गोवा (१८९१)
  • भारताचे थोडक्यांत सार (१९०१)
  • रायगड किल्ल्याचे वर्णन - छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धाराविषयी प्रार्थना (१८९१)
  • लाहोरचा प्रवास - प्रवासाची व सामाजिक परिषदेची हकीकत (१८९५)
  • वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्त (१९०१)
  • हिंदू लोकांस विनंती (१८८५)

चरित्रग्रंथ

लेखक अरुण रा. जोशी यांनी ’गोविंद बाबाजी जोशी (वसईकर) - एक उपेक्षित समाजसुधारक’ या नावाने गोविंद बाबाजींचे चरित्र लिहून केव्हातरी इ.स. १९४६च्या अगोदर प्रकाशित केले आहे.