Jump to content

"युगवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''युगवाणी''' नावाची अनेक नियतकालिके भारतातून प्रकाशित होतात. त्या...
(काही फरक नाही)

१३:५३, २७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

युगवाणी नावाची अनेक नियतकालिके भारतातून प्रकाशित होतात. त्यांपैकी विदर्भ साहित्य संघाचे साहित्य विषयाला वाहिलेले हे त्या नावाचे एक त्रैमासिक आहे. मार्च १९४५मध्ये डॉ. य.खु. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आकोट येथे झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्याअधिवेशनात संघाचे मुखपत्र असावे असा ठराव मांडण्यात आला. त्या काळात वऱ्हाड-मध्य प्रांतात वाङ्‌मय विषयास वाहिलेले एकही मराठी मासिक नव्हते. ही उणीव दूर करण्यासाठीच 'युगवाणी' या नावाचे नियतकालिक १ जानेवारी १९४६पासून प्रकाशित होऊ लागले. संपादनाची धुरा कवी वामन नारायण देशपांडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती..

मराठी भाषा व मराठी साहित्य यांची अभिवृद्धी करण्याचे धोरण 'युगवाणी’ने स्वीकारले. त्यानुसार”युगवाणी’ची दृष्टी सर्वसमावेशक राहिली. प्रांतभेदातीत लेखन हे 'युगवाणी'चे वैशिष्ट्य आहे.

युगवाणीचे संपादक

श्री. वा.ना. देशपांडे हे पहिले संपादक त्यानंतर श्री.ना. बनहट्टी, पुरुषोत्तम दिवाकर ढवळे, पु. य. देशपांडे, दि. ब. पंडित, वा. कृ. चोरघडे, पां. कृ, सावळापूरकर, प्रा. या. मु. पाठक, प्रा. श्री. मा. कुळकर्णी, श्री. मा. नी. गलगलीकर, डॉ. मधुकर आष्टीकर, प्रा. प्र. वा.ऊर्ध्वरेषे, डॉ. वि. बा.प्रमुदेसाई, शंकर बाळाजी शास्त्री, डॉ. वसंत वऱ्हाडपांडे, शरद कोलारकर, प्रा. माणिक गोडघाटे 'ग्रेस'(१९७१-७४), प्रकाश देशपांडे, डॉ. आशा सावदेकर (पहिल्या महिला संपादक), वामन तेलंग, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. सुलभा हेर्लेकर, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर आदी संपादक झाले. सध्या (२०१३ साली) प्रा. अजय देशपांडे हे मुख्य संपादक आहेत.

कवी प्रफुल्ल शिलेदार, प्रा.डॉ. दिलीप अलोणे ही कधी काळी ’युगवाणी’चे सहसंपादक होते.


वर्ग मराठी नियतकालिके