Jump to content

"मानगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मानगड हा छोटा किल्ला रायगड जिल्ह्यात, माणगाव तालुक्यातल्या निजा...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१३:४५, ५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

मानगड हा छोटा किल्ला रायगड जिल्ह्यात, माणगाव तालुक्यातल्या निजामपूर गावाजवळ आहे. (रायगडाच्या पायथ्याचे छत्री निजामपूर आणि हे निजामपूर वेगळे आहे!)

किल्ल्याला जायचा मार्ग

पुण्याहून ताम्हिणी घाटातून किंवा मुंबईहून मुंबई-गोवा मार्गावरील माणगावला येता येते. तेथून निजामपूर १० किमी आहे. निजामपूर ते पाचाड रस्त्याने गेल्यास बोरवाडी आणि नंतर मशीदवाडी हे खेडे लागते. त्या गावापासून प्रशस्त पायवाटेने पंधरा-वीस मिनिटांच्या सोप्या चढणीने मानगडाच्या अर्ध्या वाटेवरचे विंझाईदेवीचे कौलारू देऊळ लागते. विंझाईच्या मंदिरापासून खोदीव पायऱ्या चढून गेल्यावर दोन बुरुजांमध्ये बंदिस्त झालेला गडाचा दरवाजा दिसतो. दरवाज्याची कमान पडून गेली आहे. निजामपूरपासून गडापर्यंत अगदी मथ्यापर्यंत दिशादर्शक फलक लावलेले आहेत. दुर्गवीर नावाची संस्था गडाच्या संवर्धनाचे काम करते.

गडावर असलेल्या गोष्टी

  • विंझाईदेवीचे मंदिर
  • मंदिराजवळ दगडात कोरलेल्या दोन मूर्ती
  • जवळच एक छोटी दगडी दीपमाळ
  • दोन भक्कम बुरुज आणि मधे कमान नसलेला गडाचा दरवाजा
  • पडलेली कमान आणि तिच्यावरील मासा आणि कमळाचे शिल्प
  • प्रवेश दारातून आत जाऊन डावीकडे गेल्युआवर एक कोठारसदृश खोली.
  • कोठाराच्या बाहेर एक व समोर एक अशी पाण्याची दोन टाकी. तिथून सरळ गेल्यावर दोन तीन मिनिटात पायट्यांवरून गडाचा माथा
  • प्रवेश दारातून आत जाऊ नुजव्या हाताने गेले तरी गडमाथ्यावर जाता येते. पण तसे करू नये. त्या वाटेने गड उतरल्यास चहूबाजूचा किल्ला नीट बघता येतो.
  • गडमाथ्यावर एक ध्वजस्तंभा आणि पाण्यादोन टाकी.
  • माथ्यावरून पायथ्याच्या मशीदवाडी गावाचे आणि कुंभ्या घाटाजवळच्या धन्वी शिखरांचे दृश्य.
  • ध्वजस्तंभापासून गाव डावीकडे ठेऊन पुढे गेल्यास मानगडावरील काही जोत्यांचे अवशेष.
  • जोत्यांचे अवशेष पाहून पुढे गेल्यावर एक पीर आणि आणखी काही जोती.
  • मानगडावरचा लहानसा माथा अर्ध्या तासात पाहून झाल्यावर वरून आल्यावाटेने न उतरता विरुद्ध वाटेने ठोडेसे उतरून निजामपूरच्या दिशेने चालू लागलो की उजवीकडे पाण्याच्या खोदीव टाक्यांची मालिका.
  • सरळ गेल्यावर शेवटी नव्यानेच सापडलेला आणि त्याआधी पूर्णपणे मातीत गाडला गेलेला चोर दरवाजा.
  • चोर दरवाज्याला व्यवस्थित पायऱ्या असून ती वाट चाच नावाच्या गावात पोहोचते.
  • परत येताना वाटेत एक भग्न शिवमंदिर, एक ३ फ़ूट उंचीच्या चौथऱ्यावरचा भव्य नंदी.
  • मंदिराजवळच अनेक वीरगळी (वीरांच्या स्मृतिशिळा)