Jump to content

"राजेंद्र अकेरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''राजेंद्र अकेरकर''' हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. अप्लाइड मॅथेमॅटिक...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

२२:३८, २७ मार्च २०१३ ची आवृत्ती

राजेंद्र अकेरकर हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. अप्लाइड मॅथेमॅटिक्स आणि कम्प्युटरमध्ये पदवी घेऊन ते आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (सायबर) या संस्थेतून अध्यापन करू लागले. तिथे ते कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख झाले. तेच राजेंद्र अकेरकर आज नॉर्वेतील वेस्टर्न नॉर्वे ​रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर आणि वरिष्ठ संशोधक म्हणून काम करीत आहेत. त्यांचे सध्याचे संशोधन हे ’भाषा आणि अध्ययन’ यावर केंद्रित आहे.

राजेंद्र अकेरकर हे इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये व नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात अतिथी प्राध्यापक तसेच व्हिएतनाममधील हॅनोई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या अनेक संस्थांमध्ये अध्यापक आहेत.

ई कॉमर्स , सिमॅन्टिक टेक्नॉलॉजीज , कॉग्निटिव्ह टेक्नॉलॉजी आणि डाटा मायनिंग विषयक विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत अकेरकरांचा सक्रिय सहभाग असतो. कॉम्प्युटर सायन्ससंबंधी आंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळांतही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत.

राजेंद्र अकेरकर यांना आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत सुमारे १८ वर्षे संशोधन आणि अध्यापनाचा अनुभव आहे. १९९७ ते २००५ या काळात १८५ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर्स प्रोजेक्ट तर ६२ विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सच्या क्षेत्रांत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत.

संस्था स्थापना

१९९७ मध्ये ’टेक्नोमॅथेमॅटिक्स रिसर्च फाउंडेशन’ नावाच्या संस्थेची अकेरकरांनी स्थापना केली. त्यांच्या अधिपत्याखालील ही संस्था आज जगभरात एक प्रथितयश संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. ही संस्था म्हणजे नवसंशोधकांसाठी एक व्यासपीठच आहे.

संशोधन पत्रिका

अकेरकर हे ’इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन्स’ चे मुख्य संपादक आहेत, तर ’जर्नल ऑफ मेटाडाटा’ व ’सिमॅन्टिक आणि ॲन्टॉलॉजिस’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांचे सहसंपादक आहेत.

राजेंद्र अकेरकर यांनी ११ पुस्तके लिहिली असून, त्यांतली काही ही :

  • इन्टेलिजन्ट टेक्नॉलॉजीज फॉर वेब ॲप्लिकेशन
  • डिस्क्रीट मॅथेमॅटिक्स
  • नॉलेज बेस्ड सिस्टिम
  • फाउंडेशन ऑफ द सिमॅन्टिक वेब

त्यांच्या ’नॉलेज बेस्ड सिस्टिम’ या पुस्तकात मानवी निर्णयक्षमता, अध्ययन आणि क्रिया (ॲक्शन) यासंबधी केलेले मूलभूत स्वरूपाचे संशोधन आहे. हे पुस्तक कॉलेजचे विद्यार्थी, पदवीधर यांच्याबरोबरच व्यावसायिकांसाठीही उपयुक्त ठरले आहे.

पुरस्कार

राजेंद्र अकेरकर यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे देण्यात येणारा युवा संशोधक पुरस्कार मिळाला आहे.