Jump to content

"यशवंत गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होत...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

२३:१४, १२ मार्च २०१३ ची आवृत्ती

य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांची कथा आणि पटकथा य.गो. जोशींची होती.

७ नोव्हेंबरला य.गो. जोशींची पुण्यतिथी असते. त्या दिवशी नामवंतांच्या उपस्थितीत ’यशवंत संध्या’ नावाचा संगीत कार्यक्रम करण्यात येतो.

य.गो. जोशी यांचे पुस्तक प्रकाशनही होते. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांचे ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते.

य.गो. जोशी यांची साहित्य संपदा

  • आवडत्या गोष्टी
  • जाईजुई - कथासंग्रह; एकूण सोळा कथा; त्यांतील वहिनींच्या बांगड्या, अन्न आणि अन्न, आणि शेवग्याच्या शेंगा या तीन कथांवर चित्रपट निघाले.
  • दुधाची घागर
  • पुनर्भेट भाग १ ते १०
  • य.गो. जोशी यांच्या निवडक कथा
  • शेवग्याच्या शेंगा
  • सुपारी

य.गो.जोशी यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी पुस्तके

  • य. गो. जोशी : जीवन आणि वाड्मय - उषा गोखले
  • य. गो. जोशी : व्यक्ती आणि वाड्मय - सुनंदा दास


य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली पुस्तके

  • आचार्य अत्रे चरित्र आणि वाङ्मय, लेखक मा.का. देशपांडे
  • आमची अकरा वर्षे, लेखिका लीलाबाई पटवर्धन
  • आमच्य़ा देशाची स्थिती, लेखक विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • उपहासिनी, संपादक विनायक दिनकर देव
  • काळातील निवडक निबंध भाग १ ते १०, लेखक शिवराम महादेव परांजपे
  • क्रांतीच्या वाटेवर, लेखक भा.द. खेर
  • ग्रीक देश कसा स्वतंत्र झाला, लेखक शि.म. परांजपे
  • छोटा सैनिक, लेखिका तारा पंडित
  • टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
  • तिचे अखेरचे पत्र व अघोर अहंकार, लेखक ना.म. पटवर्धन
  • दरिद्री नारायण, लेखक वामन श्री. पुरोहित
  • देहूरोड, लेखक गो.ल. आपटे
  • महान क्रिकेट कर्णधार, लेखक रघुनाथ गोविंद सरदेसाई
  • प्रतिभालांच्‍छन, लेखक शंकर कृष्ण देवभक्त
  • प्रतिबिंब, लेखक वामन कृष्ण परांजपे
  • बाबू कुँवर सिंह यांचे चरित्र, लेखक गणेश सीताराम जोशी
  • महाराष्ट्रातील पाच संप्रदाय, लेखक पं.रा. मोकाशी
  • मेघदूतावर नवा प्रकाश, लेखक वामन कृष्ण परांजपे
  • रशियातील राज्यक्रांती, लेखक पां.वा. गाडगीळ
  • लक्ष्मीबाई वैद्य एक व्यक्‍तिरेखा, लेखक य.ब.पटवर्धन
  • व्यक्ति आणि वाङ्मय, लेखक श्री.के. क्षीरसागर
  • सवाई गंधर्व, लेखक पांडुरंग हरि देशपांडे
  • साहित्य संग्रह भाग १ ते ३, लेखक शिवराम महादेव परांजपे
  • सोशॅलिझम अर्थात सुलभ समाजवाद, लेखक पां.वा. गाडगीळ
  • हायडी, लेखक मिखेल शोलोखोव्ह