"औदुंबर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून औदुंबर ग्रामीण साहित्य ... |
(काही फरक नाही)
|
१३:३९, १९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलन भरत आले आहे. हे संमेलन दरवर्षी १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीला भरते. या संमेलनाची छापील निमंत्रणे पाठवली जात नाहीत. कार्यकारी मंडळाची बैठक होते. तीत अध्यक्ष निवडला जातो. संक्रातीच्या दोन दिवस आधी ही बातमी सांगलीच्या व कोल्हापूरच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होते. निमंत्रित अध्यक्ष हे नामवंत मराठी साहित्यिक असतात. जिल्ह्यांतील अनेकांना ही बातमी मौखिक प्रचाराद्वारे समजते. मग परिसरातील साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, शाळामहाविद्यालयांतील विद्यार्थी आणि अन्य साहित्यप्रेमी, औदुंबर गावी दुपारी चार वाजता पोहोचता येईल अशा बेताने आपापल्या गावी बस पकडण्यासाठी गर्दी करतात. संमेलनस्थळी असलेला लांबरुंद उंच कट्टा हे व्यासपीठ असते. छायादार वृक्षांच्या सावलीत अंथरलेल्या मोठ्या सतरंज्यांवर मंडळी आसने पकडून बसत आणि संमेलनातील वक्त्यांची भाषणे व कविसंमेलनांत कवींच्या कविता मनापासून ऐकत. भाषणे ऐकताना ज्या विशाल वृक्षाची सावली श्रोत्यांवर पडत असे, तो वृक्ष २००७ साली कोसळला. त्यामुळे त्यानंतर दरवर्षी संमेलनाच्या जागी मांडव घालावा लागतो.
इतिहास
सदानंद सामंत हे कवि सुधांशूंचे जिवलग बालमित्र होते. ते विषमज्वराने अकाली मृत्यू पावले. त्यांची आठवण रहावी म्हणून सुधांशूंनी आणि त्यांच्या मित्रांनी सदानंद साहित्य मंडळाची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून सुधाशु अपले साहित्यिक उपक्रम राबवू लागले, औदुंबर साहित्य संमेलन हा त्यांपैकी एक. दत्तो वामन पोतदार हे, १४-१-१९३९ रोजी झालेल्या पहिल्या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कवि सुधांशूंच्या निधनानंतर त्यांचा मुलगा पुरुषोत्तम आणि कराड गावचे लेखक संपादक श्रीनिवास कुलकर्णी यांनी संमेलनाची प्रथा चालूच ठेवली. यंदा इ.स. २०१२ साली ७३वे संमेलन झाले.
यापूर्वीचे संमेलनाध्यक्ष
- औदुंबर साहित्य संमेलनांची माजी संमेलनाध्यक्ष
- दत्तो वामन पोतदार, श्री.म. माटे, वि.स. खांडेकर, वि.द. घाटे, पु.ल. देशपांडे, शंकर पाटील]], विंदा करंदीकर, वसंत बापट, आनंद यादव, डॉ. रा.चिं ढेरे, ना.धों महानोर, डॉ. विजया राजाध्यक्ष वगैरे.
पहा : मराठी साहित्य संमेलने