Jump to content

"हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अमरावतीत वीर वामनराव जोशी याच्या प्रेरणेने '''हनुमान ...
(काही फरक नाही)

०१:२८, १५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

अमरावतीत वीर वामनराव जोशी याच्या प्रेरणेने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती[ संदर्भ हवा ].

१९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते, तर स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन राज्यपाल रा. सू. गवई होते.


पहा : वीर वामनराव जोशी