"कांदे नवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: आषाढी एकादशीच्या आधी येणारी नवमी महाराष्ट्रात '''कांदे नवमी''' म्ह... खूणपताका: वार्तांकनशैली ? |
(काही फरक नाही)
|
१७:००, ३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
आषाढी एकादशीच्या आधी येणारी नवमी महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. जेवणात एरवी कांदा नसला तरी या दिवशी मुद्दाम कांद्याचे खास पदार्थ म्हणजे कांद्याची खेकडा भजी, भरपूर कांदा घालून केलेले थालीपीठ, कांद्याचे पिठले बनवायचे आणि चापायचे अशी रूढी आहे. कांदा आणि गोड पदार्थ हे तसे न जुळणारे मीलन. पण या दिवशी कांद्याची खीरही केली जाते. या दिवशी कांदे उत्सव करण्याचे कारण म्हणजे पुढचे काही महिने चतुर्मासाचे असल्याने आहारातून कांदा, लसूण व वांगे हे तामसी पदार्थ हद्दपार असतात. शास्त्रानुसार एरवीही कांदा वर्ज्यच मानला आहे, पण आपल्या पूर्वजांना मनुष्यस्वभाव पूर्णपणे माहीत असल्याने किमान चातुर्मासामध्ये तरी कांदा खाऊ नये अशी अट घातलेली आढळते.
असे असले तरी, या दिवसाच्या पंचागात कांदे नवमी असे लिहिलेले बहुधा आढळत नाही