"मुकुंद श्रीनिवास कानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे (जन्म : ३ डिसेंबर १९३१;मृत्यू : २५ जून २०... खूणपताका: विशेषणे टाळा |
(काही फरक नाही)
|
२२:५१, २७ जून २०१२ ची आवृत्ती
डॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे (जन्म : ३ डिसेंबर १९३१;मृत्यू : २५ जून २०१२) हे मराठीतले एक लेखक, समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक होते. पदव्युत्तेर शिक्षणानंतर लगेच ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. संत साहित्य आणि अर्वाचीन साहित्यावरील डॉ. कानडे यांचे अभ्यासपूर्ण लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. नाटक आणि नाट्यसमीक्षा या विषयावर लेखन व अनेक ग्रंथांचे संपादनही कानडे यांनी केले. इ.स.१९७६ ते १९९१ या काळात ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन करत होते. तेथूनच विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते माजी सदस्य होते. त्यानी विश्वकोशातील काही लेखांचे लेखन केले आहे.
मु.श्री.कानडे यांची ग्रंथसंपदा
- एकनाथी भागवत : शब्दार्थ संदर्भ कोश
- काही संत : काही शाहीर
- कालचे नाटककार (इ.स.१९६७)
- गाभारा
- नाट्यशोध (नाट्य समीक्षा)
- प्रयोगक्षम मराठी नाटके
- भाऊसाहेबांची बखर
- भारत इतिहास संशोधक मंडळाने शके १८३२ ते १९०२ या काळात प्रसिद्ध केलेल्या लेखांची सूची
- मराठीचा भाषिक अभ्यास
- मराठी रंगभूमीचा उष:काल
- मराठी रंगभूमीची ५० वर्षे
- मराठी शब्दसमीक्षा
- श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश
- संत चोखामेळा - अभंगवाणी
- संत नामदेव काव्यदर्शन
- संत नामदेवांचा सार्थ चिकित्सक गाथा
- संत साहित्य : संदर्भ कोश खंड १
- संतांची हे भेटी
- संतांच्या अंतरंगाचा शोध
पुरस्कार
- संत विद्या प्रबोधिनी, गोरटे(नांदेड जिल्हा) या संस्थेतर्फे संतकवी श्रीदासगणू महाराज पुरस्कार