"युरोपीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पॅरीसजवळ जुई आँ जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणे... |
(काही फरक नाही)
|
२३:११, १५ जून २०१२ ची आवृत्ती
पॅरीसजवळ जुई आँ जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणेशपूजा करून सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचे १८जुलै २००८ रोजी उद्घाटन झाले.
संमेलनाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात जर्मनीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गोखले, निषाद फाटक आणि अक्षय जोशी यांनी मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. सतरा परदेशी भाषा अस्खलित बोलणाऱ्या मुंबईच्या अमृता जोशीची मुलाखत सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती.
संध्याकाळच्या सत्रात डॉ. मोहन आगाशेंनी श्रोत्यांशी संवाद साधला होता. मनोरंजनाची भूल देऊन शिक्षणाची शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र आपण राबवतो असे त्यांनी यावेळी सांगितले. परदेशातल्या मराठी रसिकांसमोर नव्या दमाची मराठी नाटके आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याकरिता सुरुवातीला ’साठेचं काय करायचं' या नाटकाचा हा प्रयोग या उद्देशानेच युरोपियन मराठी मंडळींसमोर आणत आहोत असं ते म्हणाले.
त्यानंतर राजीव नाईक लिखित, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी अभिनीत नाटकाच्या प्रयोगाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.