विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विविध ज्ञानविस्तार
प्रकार मासिक
विषय माहितीपर (विविध ज्ञानशाखा)
भाषा मराठी
माजी संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर
खप मर्यादित
स्थापना इ.स. १८६७
पहिला अंक इ.स. १८६७
देश ब्रिटिश भारत
मुख्यालय मुंबई

विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२].

वाटचाल[संपादन]

इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३].

शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १८७२ - इ.स. १८७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४].

संकेतस्थळावर विविध ज्ञानविस्‍तारचे अंक[संपादन]

जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक Archived 2016-08-12 at the Wayback Machine. ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे. महाराष्ट्र संस्कृती. p. ७८१.
  2. ^ मराठी विश्वकोश, खंड ८.
  3. ^ a b मराठी विश्वकोश, खंड ५.
  4. ^ "विद्वत्तेचा वाटाड्या, समीक्षेचा आदर्श". Archived from the original on ५ ऑगस्ट २०१४. १८ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)