विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विविध ज्ञानविस्तार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
विविध ज्ञानविस्तार
प्रकार मासिक
विषय माहितीपर (विविध ज्ञानशाखा)
भाषा मराठी
माजी संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर
खप मर्यादित
स्थापना इ.स. १८६७
पहिला अंक इ.स. १८६७
देश ब्रिटिश भारत
मुख्यालय मुंबई

विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२].

वाटचाल[संपादन]

इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३].

शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १८७२ - इ.स. १८७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४].

संकेतस्थळावर विविध ज्ञानविस्‍तारचे अंक[संपादन]

जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे (इ.स. १९७९). महाराष्ट्र संस्कृती (मराठी मजकूर) (तिसरी आवृत्ती (इ.स. २००३) आवृत्ती.). कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे. पान क्रमांक ७८१. आय.एस.बी.एन. ८१-७४२१-०५७-१ Check |isbn= value (सहाय्य). 
  2. ^ मराठी विश्वकोश, खंड ८ (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. 
  3. a b मराठी विश्वकोश, खंड ५ (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. 
  4. ^ "विद्वत्तेचा वाटाड्या, समीक्षेचा आदर्श" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. २४ जानेवारी, इ.स. २००४. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ५ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). १८ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.