Jump to content

विल्यम वर्ड्‌स्वर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम वर्ड्‌स्वर्थ

विल्यम वर्ड्‌स्वर्थ (एप्रिल ७, १७७० - एप्रिल २३, १८५०) हा इंग्लिश भाषेतील प्रसिद्ध कवी होता. विल्यम शेक्सपियर यांच्यानंतर इंग्रजी साहित्यात याच वर्ड्‌स्वर्थचे नाव आदराने घेतले जाते.

जॉन वर्ड्‌स्वर्थ आणि ॲन कुकसन यांच्या पाच अपत्यांतील विल्यम दुसरे. मोठे झाल्यावर विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांचा मोठा भाऊ रिचर्ड हे वकील झाले, लहान बहीण डॉरथी या विल्यम सारख्याच कवयित्री झाल्या, त्यानंतरचा भाऊ जॉन हेही कवी होते तर सगळ्यात लहान भाऊ क्रिस्टोफर हे मोठे झाल्यावर एक विद्वान म्हणून नावाजले गेले.

विल्यमचे वडील जॉन हे जेम्स लोथर नावाच्या एका जमीनदाराकडे (Earl) नोकरीस होते. त्यांना मुलांसाठी वेळ कमी मिळत असे. पण जेव्हा मोकळा वेळ मिळे तेव्हा ते शेक्सपियर, मिल्टन, स्पेन्सर सारख्या कवींच्या कविता मुलांना शिकवत असत. त्यामुळे मुलांना साहित्यात गोडी निर्माण झाली. १७७८ साली विल्यमच्या आईचे निधन झाले. त्यानंतर विल्यमला हॉकशेड ग्रामर स्कूल या शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या शाळेतील मेरी हचिंसनशी त्यांची मैत्री झाली, मोठे झाल्यावर विल्यमने त्यांच्याशी लग्न केले.

१७८७ साली केंब्रिजाच्या सेंट जॉन कॉलेजमध्ये शिकत असतांना विल्यमने पहिले सुनीत (Sonnet) लिहिले आणि हळूहळू ते निसर्ग कवी, तलावाच्या जिल्ह्यातील कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. विल्यम यांनी १७९०-९१ साली फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली येथील अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्या. फ्रान्समध्ये त्यांची ओळख अनेट वॅलनशी झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह केला. त्यांना कॅरोलिन नावाची मुलगी झाली. फ्रान्स आणि इंग्लंड मधल्या तणावामुळे बायको आणि मुलीला तेथेच सोडून विल्यम एकटेच इंग्लंडला परतले. विल्यमला नेहमीच आपल्या बायको आणि विशेषतः लहान मुलगी कॅरोलिनची आठवण येत असे. त्यांनी कॅरोलिनवर कविता लिहिल्या. १७९३ मध्ये विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांचे ॲन ईव्हनिंग वॉक आणि डिस्क्रिप्टिव्ह स्केचेस नावाचे कविता संग्रह प्रकाशित झाले. हे दोन्ही कविता संग्रह गाजले; कविता लिहिण्यासाठी विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांना ९०० पाउंडची शिष्यवृत्ती देण्यात आली.

१७९५ साली विल्यम वर्ड्‌स्वर्थ यांची कॉलरिज यांच्याशी ओळख झाली, पुढे दोघांची मैत्री जमली. १७९८ साली प्रकाशित कॉलरिज आणि वर्ड्‌स्वर्थ यांनी मिळून लिरिकल बॅलाड्स नावाचा कविता संग्रह लिहिला. हा कविता संग्रह Romantic Movement मधला सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो.

पुस्तके[संपादन]

विल्यम वर्ड्‌स्वर्थच्या अनेक कविता मराठीत रूपांतरित झाल्या; त्यांची पुस्तके मात्र बनली नाहीत. वर्ड्‌स्वर्थ, शेक्सपियर, टेनिसन, लाँगफेलो आदी कवींच्या कवितांचे मराठी भावानुवाद डॉ. हेमा क्षीरसागर यांनी केले आहेत. ते ’बिंब प्रतिबिंब’ या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाले आहेत.

विकिक्वोट
विकिक्वोट
विल्यम वर्ड्‌स्वर्थ हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.