Jump to content

विलास चाफेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विलास चाफेकर हे पुण्यातील वंचित विकास या संस्थेचे संस्थापक आहेत. इतर अनेक कामांसमवेत देवदासीना मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य ही संस्था करते. चाफेकरांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.[]

विलास चाफेकर यांनी मुंबई विद्यापीटातून त्यानी सुवर्णपदक मिळवीत एम.ए. (हिंदी) केले आहे, त्याशिवाय ते पुणे विद्यापीठाचे M.Ed. आहेत. 'Education science : Comparative studies of education -various countries'हा प्रबंधासाठीचा विषय घेऊन पीएच.डी. करत होते, पण ते काम अपुरे राहिले. वयाच्या १७व्या वर्षी विलास चाफेकरांनी भटकी मुले, झोपडपट्टीतील मुले आदींच्या उन्नतीसाठी समाजकार्यास सुरुवात केली. वयाच्या ७५व्या वर्षीदेखील ते शिक्षण, आरॊग्य, भूमिहीनांची उन्नती, भटक्या जमाती यांसारख्या सामाजिक विषयांत सक्रिय आहेत. 'नीहार' ही त्यांनी त्यांनी वेश्यांच्या मुलांसाठी वसवलेली वसाहत आहे. हिची सुरुवात ५ जुलै १९८९ रॊजी झाली.[]

वंचित विकास मार्फत विलास चाफेकर चालवत असलेले प्रकल्प

[संपादन]
  • अभया (एकाकी स्त्रियांना एकत्र आणणारी संस्था)
  • अभिरुची : वंचित मुलांसाठी खेळ, नाच, गाणी, अभिनय आदी शाळाबाह्य उपक्रम राबवणारी संस्था
  • अवयवदान जागृतीसाठी काम करणारी संस्था
  • आदिवासी मुलींचे चंडिकादेवी वसतिगृह
  • एचआयव्ही/एड्स जागृति कार्यक्रम राबवणारी संस्था
  • निर्मळ रानवारा (मुलांसाठीचे सन १९८४ पासून प्रकाशित होणारे मासिक)
  • फुलवा : नीहारमध्यॆ जागा न मिळालेल्या मुलांसाठी बालवर्गापासून ते संगणक शिक्षणापर्यंत शिक्षण देणारी शाळा
  • मानवनिर्माण (समाजसेवेसाठी स्वयंसेवक बनवणारी संस्था)
  • लातूरचे सबला महिला केंद्र : मराठवाड्यातील ग्रामीण भागांतून आलेल्या घटस्फोटित, परित्यक्ता आणि विधवा स्त्रियांना मदत करणारी संस्था
  • पुण्याचे सबला महिला केंद्र
  • वेश्यावस्तीतील स्त्रियांसाठी आरोग्य आणि समुपदेशन केंद्र

पुस्तके

[संपादन]
  • रात्रंदिन आम्हा... (आत्मचरित्र) २०१६ साली प्रसिद्ध.
  • नीहार
  • १६ डिसेंबर
  • पंचायत राज

पुरस्कार

[संपादन]
  • पुणे महापालिकेकडून समाजभूषण पुरस्कार
  • समाजशिल्पी पुरस्कार (मुंबई, १९९५)
  • समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार
  • हृदयमित्र प्रतिष्ठानचा पुरस्कार


संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "वंचित विकास संस्थेचे विलास चाफेकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार". Loksatta. 2018-12-16 रोजी पाहिले.
  2. ^ "एका कार्यकर्त्याचे प्रांजळ आत्मकथन". Maharashtra Times. 2017-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-30 रोजी पाहिले.

२. http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a17124&lang=marathi[permanent dead link]

३. https://m.dailyhunt.in/news/india/marathi/policenama-epaper-policnam/samajakary+karatana+svatahche+aarogy+japave+vilas+chaphekar-newsid-95089778

४. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/autobiography-by-vilas-chafekar/articleshow/56705540.cms Archived 2017-09-15 at the Wayback Machine.