Jump to content

विनायक देवरुखकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखक तथा नाटककार कै. विनायक देवरूखकर यांचा अल्प परिचय :- विनायकराव देवरूखकर मूळचे वाईचे त्यांचा जन्म 1914 मध्ये मलकापूर येथे झाला व 1991 मध्ये पुण्यामध्ये त्यांचे वृद्धापकाळाने देहावसान झाले, शालेय शिक्षण पुण्यात झाले महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये एसपी व फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंटर-आर्टस पर्यंत झाले. कादंबरीकार, दैनिक संध्या पत्रकार, ललितलेखन आणि पुणे आकाशवाणी मधील श्रुतीका लेखक असा लौकिक त्यांनी मिळविला होता त्यांनी सुमारे 1950 आली लिहिलेले मराठी नाटक डॉक्टर कैलास हे खूप गाजले होते त्यामध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट इमप्लांट हा विषय प्रथमच मांडण्यात आला होता ते अत्यंत पुरोगामी व बुद्धीप्रामाण्यवादी विचाराचे होते त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या व ऐतिहासिक पुस्तके देखील लिहिली व गाजली.पुण्यातील म्युझिकोचे इन्स्टिट्यूटचे संस्थापक गिटारवादक कै. विनयकुमार देवरुखकर हे त्यांचे पुत्र होते, विनता कारेकर, वीणा घांग्रेकर व वासंती सावरकर या मुली होत व कै. प्रा विजय कारेकर हे जावई होते.