Jump to content

विदुला टोकेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विदुला टोकेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्या ट्रान्सलेशन पनाशिया ही भाषांतर कंपनी चालवितात. या एक व्यावसायिक, उद्योजक व लेखिका आहेत. औद्योगिक क्षेत्रातील २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी ऑक्टोबर २००७ मध्ये "पॅनाशिया" या नावने स्वतंत्र उद्योग सुरू केला. बॅक ऑफिस सेवा सुविधा, डेटा मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण व् आणखीही इतर सेवा पॅनाशियामार्फत दिल्या जातात. उद्योजकता व उद्योगातील सर्जनशीलता हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. महिला उद्योजकता विकासासाठी केलेल्या कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. सर्जनशील उद्योजकता या विषयावरील आशियाई अभ्यास बैठकीत भारताकडून सहभागी होण्याचा व तेथे निबंध वाचण्याचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. सध्या त्या पुण्यात असतात व panaceapune@rediffmail.com या पत्यावर त्यांच्याशी संपर्क साधता येतो. [१]

पुस्तके

[संपादन]
 • अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी (मूळ इंग्रजी, 7 habits of highly effective people, लेखक - स्टीफन आर. कवी)
 • अनब्रेकेबल (आत्मचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका मेरी कोम)
 • इराणमधून सुटका (मूळ इंग्रजी, Out of Iran, ले़खिका - सुझान आझादी, अँजेला फेरान्ते)
 • जीवन बदलून टाकणारी संकल्पना, (मूळ इंग्रजी लेखिका- सुझी वेल्श)
 • टाटा - एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती (मूळ इंग्रजी, TATA-THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND, लेखक - मॉर्गन विट्‌झेल)
 • डेफ हेवन (मूळ इंग्रजी, लेखिका - विराणी पिंकी)
 • तुम्ही श्रीमंत व्हावं असं आम्हाला का वाटतं? (मूळ इंग्रजी लेखक - रॉबर्ट कीयोसाकी)
 • १०-१०-१० (मूळ इंग्रजी, लेखिका - सुझी वेल्श)
 • बाळमासा (मूळ इंग्रजी, grayson, लेखक - लिन कॉक्स)
 • मॅन इंटरप्टेड (मूळ इंग्रजी लेखक - जेम्स बेली)
 • मी हलवलं तुमचं चीज (मूळ इंग्रजी, I moved your cheese, लेखक - दीपक मल्होत्रा)
 • मैत्री बॅलंस शीट सोबत : नफा तोटा पत्रक (मूळ इंग्रजी लेखक - अनिल लांबा)
 • लोकव्यवहार कौशल्ये : तुम्हाला जमेल (मूळ इंग्रजी, लेखिका - बार्बरा/ॲलन पीस)
 • सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ इंग्रजी, सीता - ॲन इलस्ट्रेटेट री-टेलिंग ऑफ द रामायण, लेखक - देवदत्त पट्टनाईक)
 • STAY हंग्री STAY फूलिश (मूळ इंग्रजी, लेखक - रश्मी बन्सल)
 1. ^ बन्सल, रश्मी (२००८). स्टे हंग्री स्टे फूलिश. पुणे: अमेय प्रकाशन. pp. ४१३. ISBN 978-81-907294-7-5.