Jump to content

वि.गो. खोबरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विठ्ठल गोपाळ खोबरेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

विठ्ठल गोपाळ खोबरेकर (इ.स. १९२३ - इ.स. २००७) हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते.

वि.गो. खोबरेकर
जन्म नाव विठ्ठल गोपाळ खोबरेकर
जन्म २० जुलै, इ.स. १९२३
शिक्षण पदव्युत्तर, पीएच.डी.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास, पुराभिलेख
भाषा मराठी, इंग्रजी
साहित्य प्रकार इतिहास
विषय कोकणचा इतिहास, मराठा इतिहास
संघटना इतिहास संशोधन मंडळ, मुंबई
प्रसिद्ध साहित्यकृती महाराष्ट्रातील दप्तरखाने
मराठेकालीन कोकणचे सामाजिक व आर्थिक जीवन
कोकणचा राजकीय इतिहास
वडील गोपाळ खोबरेकर

खोबरेकर हे भारतीय इतिहास आणि संस्कृती या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाद्वारे प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाचे विनामानधन तहहयात संपादक होते. त्यांना या कामाबद्दल ५०० रुपये भत्ता मिळत असे.

पुस्तके

[संपादन]
  • इंग्रजी सत्तेविरुद्ध महाराष्ट्रातील सशस्त्र उठाव, १८१८-१८६० (१९५९)
  • कोकणच्या इतिहासाची साधने (१९७१)
  • गुजरातेतील मराठी राजवट १६६४-१८२० (१९६२)
  • चिटणिसी दप्‍तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची (१९७१)
  • पारसनिसी दप्‍तरांतील कागदपत्रांची वर्णनात्मक सूची (१९७५)
  • मराठा अंमलाचे स्वरूप (१९८८)
  • मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे (१९६९)
  • महाराष्ट्रातील दप्‍तरखाने : वर्णन आणि तंत्र (१९८८)
  • महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे : इ.स. १८१८ ते १८८४ (१९९४)
  • हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त (संपादित, १९७४)
  • यशवंतराव चव्हाण: विधी मंडळातील भाषणे (मराठी-इंग्रजी)
  • Records of the Shivaji period
  • कोकणचा राजकीय इतिहास इ.स.पूर्व ते इ.स. १८१८
  • महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग २
  • Tarikh-I Dilkasha (English translation)

पुरस्कार

[संपादन]

मराठी ग्रंथ संग्रहालयाकडून दरवर्षी एका इतिहासविषयक संशोधनपर लिखाण करणाऱ्या कोकणातील लेखकाला इतिहास संशोधक डॉ. वि.गो. खोबरेकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. इतिहास संशोधनाव्यतिरिक्त, वैचारिक लेखन आणि कादंबरी, नाटक, काव्य, समीक्षा यासारख्या वाड्मयीन क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रंथालाही हा पुरस्कार मिळू शकतो..

२०१४-१५ सालातील हा पुरस्कार सदाशिव टेटविलकर यांच्या `महाराष्ट्रातील वीरगळ’ या ग्रंथाला मिळाला.