Jump to content

विठ्ठलगड (बीड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील विठ्ठलगड, बीड या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. येथील पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात भगवानबाबा महाराजांची आणि विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आहे. मकराणा जातीच्या पांढऱ्या दगडात या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बाबाचा देशभर हजारोंवर अनुग्रहित भक्त परिवार आहे. वर्षभरात हजारो भाविक येथील मंदिराला भेट देतात.