विठाबाई नारायणगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:Vithabai Bhau Mang Narayangaonkar.jpg
विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या तमाशासम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात पंढरपूर येथे झाला.

नाटक[संपादन]

विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी ‘विठा’ हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला फिरोदिया करंडक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. झी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिकही ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू घुले यांचे असून व्यावसयिक रंगमंचावर हे नाटक ‘हिंदुस्थान थिएटर कंपनी’ करते.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.