विकिपीडिया चर्चा:Bot

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपीडियाच्या बॉट पॉलिसी युनीव्हर्सल नसून स्वतंत्रपणे मराठी विकिपीडियात निर्णय होतात

नॉन-मराठी बॉट्स(अमराठी) सांगकाम्यां करिता धोरण निती नियमांची रूपरेषा २००६ मध्ये आखून दिली होती. आधे मधे तुरळक चर्चा झाली तरी मराठी बॉटस करिता सविस्तर पॉलिसीची आवश्यकता भासली नव्हती. गेल्या वर्षाभरात मराठी बॉट्सची संख्या आणि अनूभव पाहता फॉर्मल पॉलिसीची चर्चा होण्यास हरकत नसावी. काही जुन्या चर्चांचे संदर्भ खाली उधृत केले आहेत . आपापले मुद्दे मांडावेत.

मराठीभाषी 'सांगकाम्या'चे काही फायदे[संपादन]

  सांगकाम्यांची आठ सर्वात मोठ्या विक्शनरींना कशी मोठी मदत झाली त्याचा आलेख Wiktionary_statisticsयेथे पहा.
  काही फायदे-काळजी सूचवत आहे कृपया साधक बाधक चर्चा करावी.
  मराठी देवनागरी लिपीचा अधिकृत वापर
  अमराठी सांगकाम्यांनी केलेले बदल योग्य आहेत का ते भवीष्यात तपासता येईल(?).
  आंतरविकि दुवे अधिक वेगाने बनवता येतील
  विशीष्ट अशुद्धलेखन (ऍक्रॉस आर्टीकल्स -मराठी शब्द सुचवा) दुरुस्त करता येईल.
  विरामचिन्हांच्या काही चुका दुरूस्त करता येतील
  मराठी उच्चारणांबद्दल, मराठी शुद्धलेखनाचे नियम आणि मराठी व्याकरणा संदर्भात प्रमाणित असतील.
  चर्चा पानांची आपोआप साठवण करता येईल.
    सांगकाम्या वापरताना घ्यावयाची काळजी
  शक्यतो 'सांगकाम्या' मानव नियंत्रीत असावा,
  शुद्धलेखन सांगकाम्याने प्रत्येक वेळी पाच ते आठ मराठी शब्दांच्या शुद्धरूपां बद्दल सुचना मागवाव्यात.
  शुद्धरूपां बद्दल सुचनाकरण्या करता एक नक्कीचर्चा पान असावे.
  या पानाचे तीन विभाग असावेत पहीला विभाग अशुद्धलेखनाचे रिपोर्टींग सद्स्यां कडून घेईल;
  दुसरा विभागात सांगकाम्या नियंत्रक पाच ते आठ शब्दाकरीता शुद्धलेखन सुचना कौल स्वरूपात मागवेल. *शुद्धरूपांना "जलदबदल सहमती" "अनिश्चीत सहमत" "असहमत" अशा पर्यायांनी "शब्दरूप" कौल घ्यावा.
  अनिश्चीत सहमत" "असहमत शब्द वेगळ्या विभागात 'शब्दवार' उपविभाग स्थापून चर्चा घडवावी.
  निश्चीत आणि अविवाद्य सहमती(कन्सेन्सस) झालेलेच शब्द निवडावेत
  दिर्घ 'आणी' खूप दूर्मीळ स्वरूपात वापरला जातो अशा अपवादांकडे गोष्टींकडे नियंत्रकाचे लक्ष असावे.
  शक्य झाले तर प्रमाण संदर्भग्रंथाची निश्चीती करावी.
  माझे वैयक्तिक मत अरूण फडके संकलीत "लेखनकोष" प्रमाण मानावा कारण हा लेखन कोष सर्वाधिक संशोधन होऊन आधीच्या सर्व मराठी कोषांची दखल घेऊन परिष्कृत आहे.शब्दांची सर्व सामान्यरूपांचे शुद्धलेखन दाखवतो आणि आजच्या काळातील नावाजलेले मराठी भाषा अभ्यासक ग. ना. जोगळेकर यांनी हा कोष तपासला आहे.
  नवीन अमराठी परभाषि शब्दांच्या रूपा बाबत मनोगत किंवा तत्सम ब्लॉगवर सुद्धा चर्चा घडवावी आणि अशा चर्चेचा संदर्भ देऊन त्या अनुशंगाने कौल घेऊन निश्चिती करावी.
  मुद्दाम अशुद्धता दाखवणारी पाने/विभाग सांगकाम्याने वगळावेत.
  संपुर्ण स्वयंभू सांगकाम्यांच्या कामाचे कामचालू करण्या पुर्वी व नंतर व्यवस्थित परीक्षण आणि परिशिलन व्हावे.
  हिंदी भाषिक व्याकरण व सांगकाम्यांचे अधिक मराठी हिंदी द्वीभाषातज्ञ व्यक्ति कडून परीक्षण करून मगच परवानगी द्यावी.

Mahitgar 07:13, 25 डिसेंबर 2006 (UTC)

सांगकाम्या तडकाफडकी थांबवण्यासाठीचा साचा आणि नियम[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर सांगकाम्यांकडून बदल होत असताना मूळ लेखात नको ते बदल होउन लेखात चुका होण्याची शक्यता असते. वर अभिजितने लिहिल्याप्रमाणे याची प्रचीतीही आपल्याला नुकतीच आली. (सध्या चाललेल्या गरमागरम चर्चेमुळे मुद्दाम लिहीतो की खाली लिहिलेले संतोष किंवा इतर कोणाही सदस्यावर व्यक्तिगत टीका किंवा उपदेश नाही तर मराठी विकिपीडियावरील काम अधिक सुरळीत कसे व्हावे याबद्दलचा प्रयत्न आहे.)

तर यावर सांगकामे नकोतच किंवा सांगकाम्याचे प्रत्येक संपादन चालविणार्‍याने तपासून पाहिले पाहिजे असे टोकाचे नियम अथवा सांगकामे हवे तर असे होणारच असे म्हणण्यापेक्षा सुवर्णमध्य गाठणे हिताचे होईल. सांगकामे करतात ते काम बहुमोल आहे. सांगकाम्यांनी केलेले बदल हाताने करण्यासाठी असलेल्या तुटपुंज्या संपादकसंख्येचा लाखमोलाचा वेळ वाया जाईल. पण त्याचवेळी undue risk[मराठी शब्द सुचवा] घेणेही आपल्याला परवडणार नाही. तर त्यासाठी मी खालील दोन-तीन उपाय सुचवू इच्छितो. तुमचे मत द्या आणि इतरही काही उपाय असतील तर सुचवा.

१. नवीन सांगकाम्या चालविणार्‍याने (सुरुवातीस तरी) आधी धूळपाटीवर प्रयोग करुन पहावे. यासाठी लागल्यास पाहिजे तितकी पाने धूळपाटीवर तयार करावी - उदा. मराठी चित्रपटांवर चालविण्यासाठी असलेल्या सांगकाम्याचा प्रयोग करण्यासाठी १०-१२ खरी चित्रपट पाने धूळपाटीवर हलवावी आणि सांगकाम्याला त्यांवर बदल करण्यास हुकुम सोडून तेथे झालेले बदल तपासून पहावेत.

२. त्यानंतर मूळ नामविश्वातील पानांवर आपला सांगकाम्या चालविण्याआधी अशा सदस्याने चावडीवर इशारा द्यावा म्हणजे इतर संपादकांनाही वाटल्यास ते बदलांवर लक्ष देतील. सांगकाम्या चालविणार्‍या सदस्याने पहिले काही बदल हाताने तपासून पाहिले पाहिजेत हे सांगणे वेगळे नको.

३. यापुढे मराठी विकिपीडियावर नवीन सांगकाम्या चालविणार्‍याला त्या सांगकाम्याच्या सदस्यपानावर त्या सांगकाम्याचे काम तडकाफडकी थांबवण्यासाठी एक आपत्कालीन कळ असायलाच पाहिजे अशी सक्ती करावी म्हणजे एखाद्या मोकाट सुटलेल्या सांगकाम्यास पटकन आवर घालणे प्रचालकांना सोपे जाईल. यासाठी en:Template:Emergency-bot-shutoff हा दुवा पहा. हा येथे आणावा म्हणतो.

असो, तुमचे मत आणि इतर उपायही कळवा.

अभय नातू २३:३३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

वरील मुद्द्यांबाबत
सांगकाम्याचे काम तडकाफडकी थांबवण्यासाठी एक आपत्कालीन कळ असायलाच पाहिजे अशी सक्ती करावी म्हणजे एखाद्या मोकाट सुटलेल्या सांगकाम्यास पटकन आवर घालणे प्रचालकांना सोपे जाईल.
माझ्या सांगकाम्या पानावर ही कळ आहेच.
मराठी विकिपीडियावर सांगकाम्यांकडून बदल होत असताना मूळ लेखात नको ते बदल होउन लेखात चुका होण्याची शक्यता असते
सांगकाम्याने केलेले बदल कळणार कसे? कारण कालच (८ ऑक्टोबर २०११) संकल्पच्या सांगकाम्याने केलेले ५१ बदल आहेत. ते अलीकडील बदलमध्येसुद्धा दिसत नाहित. मग नको ते बदल कसे कळणार? आणि मोकाट सुटलेल्या सांगकाम्याला कसा आवर घालता येणार?
संतोष दहिवळ ०६:५९, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार संतोष,
मी वर म्हणल्याप्रमाणे हा प्रस्ताव तुमच्या सांगकाम्याला लक्ष्य ठेवून केलेली नाही, तर पुढे जाता असे होऊ नये म्हणून केलेली आहे.
तुमच्या पानावरील कळ मी पाहिली नव्हती, कारण असे काही असू शकते याची मला फक्त पुसटशी कल्पना होती पण तुम्ही ती घातली असेल हे माहिती नव्हते. ही माझी चूक म्हणा हवे तर ... :-D
संकल्पच्या सांगकाम्याने केलेले ५१ बदल आहेत. ते अलीकडील बदलमध्येसुद्धा दिसत नाहित.
अलीकडील बदल मध्ये by default सांगकाम्यांचे बदल दिसत नाहीत. त्यासाठी त्याच पानावरील 'सांगकामे(बॉट्स) पाहा' अशा दुव्यावर टिचकी द्यावी लागते. हे झाले सांगकाम्या असे ठरलेल्या सदस्याबद्दल. तुमच्या सांगकाम्याला (तसेच इतर होतकरू सांगकाम्यांना) अजून bot flag मिळालेला नसल्याने त्यांचे बदल अलीकडील बदलमध्ये लगेचच दिसतात. सहसा एखाद्या सदस्याला हा flag देण्याआधी त्याला Wikipedia:bot येथे विनंती करावी लागते त्यावेळी मी (प्रशासक या नात्याने) त्याचे योगदान नजरेखालून घालतो व नंतरच असा flag देतो.
मग नको ते बदल कसे कळणार?
जेव्हा bot flag नसतो तेव्हा अशा सांगकाम्याचे बदल अलीकडील बदल मध्ये लगेचच दिसतात व इतर सदस्यही नजरेत ठेवतात. bot flag असलेल्यांचे बदल लेखांमध्ये दिसतात तसेच वर म्हणल्याप्रमाणे अलीकडील बदल मध्येही दिसतात. bot flag देईपर्यंत या सांगकाम्याकडून चुका होत नाहीत ना असे पाहिलेले असते तेव्हा असे होण्याचा संभव कमी असतो.
मोकाट सुटलेल्या सांगकाम्याला कसा आवर घालता येणार?
या कळीवर टिचकी दिली असता प्रचालक त्या सांगकाम्याकडून (तो चालविणार्‍या सदस्याकडून नव्हे) होणारे पुढील बदल बंद करतात व त्याच्या मालकाशी संवाद साधून हवे-नको ते सांगतात.
तर तुम्ही विचारलेले प्रश्न मार्मिक आहेत आणि आशा आहे या उत्तरांनी या प्रस्तावाबद्दल अधिक माहिती उजेडात आली असेल. अधिक प्रश्न असल्यास विचारालच.
अभय नातू १६:५४, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

बद्दल माहिती[संपादन]

काही ठिकाणी बद्दल केली आहे. इंग्लिश व्याकरणासह नवीन पान विनंती करण्यास बनवले. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:५२, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)