विकिपीडिया चर्चा:आशियाई महिना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया आशियाई महिना ? - अनवधानाने पण चूक होणर नाही ह्याची काळजी घ्या[संपादन]

नमस्कार,

आपण विकिपिडीयावर अनेक दिवसांपासून काम करीत आहात त्या अनुषंगाने आपण जुने सदस्य आहात असे म्हणता येईल. अधून मधून विकिपीडिया समाजातील घडामोडींची माहिती मराठी विकिपिडीयावर टाकून आपण येथील सदस्यांना मुख्य प्रहावातील घटनाची माहिती देण्याचे उत्तम काम करीत आहात. परंतु असे करीत असतांना मराठी विकिपीडियाच्या मूळ तत्वांना धक्का लागणार नाही ह्याची काळजी पण आपण घेणे गरजेचे आहे,

मराठी विकिपिडीयावर माहिती इंग्रजी भाषेत टाकू नये. भाषांतर करूनच ते टाकावे. भाषांतर करण्याची सवड नसल्यास असले लिखाण हे दुतावासात लिहावे.

दुसरे असे कि आपणास कल्पना असेल कि विकिपिडीयावर वेग वेगळ्या माहिती साठी वेग वेगळी नामविश्वे आहेत. माहिती देण्यासाठी चावड्या आहेत त्याचे पण विषयानुसार वर्गीकरण आहे. आपण मुख्य नामविश्वात जेथे विश्वकोशिय दाखल पात्रतेचे प्रमाण मराठीतील देवनागरी लिपीतून केवळ लेखांचेच लिखाण अपेक्षित आहे तिथे इंग्रजीतून माहिती वजा जाहिरातीचे लिखाण करणे हे आपल्या अनुभव आणि जेष्ठातेला न शोभणारे वर्तन वाटले म्हणून हे लिहिण्याचा परिपाक केला.

आपण ह्यास सकारात्मक दृष्टीने घ्याल आणि भविष्यात अशी चूक अनवधानाने पण होणर नाही ह्याची काळजी घ्याल हीच अपेक्षा. - Nankjee (चर्चा) १९:१३, २ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

लेख पूर्ण करण्यास मदत हवी[संपादन]

या लेखात Flatlist हा साचा आयात करावयाचा राहीला आहे, तसेच इतरही formatting करावयाचे राहीले आहे. यात कोणी मदत करेल काय?

--वि. नरसीकर (चर्चा) २१:२६, २ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]

लेखासाठी दुरुस्त्या[संपादन]

मूळ वाक्ये : विकिपीडिया आशियाई महिना जी नोव्हेंबर २०१५ मध्ये होईल, ही एक ऑनलाईन Edit-a-thon[मराठी शब्द सुचवा](संपादन-शर्यत?) आहे ज्याचे लक्ष्य, विकिपीडिया आशियाई सामाजांमध्ये सामंजस्य वाढविणे हे आहे.

आशियायी महिन्याचा उद्देश [आपल्या भाषेतील]विकिपीडियामध्ये,[आपला देश] सोडुन, इतर आशियायी देशांमधील लेखांबद्दल, लेखाची संख्या व दर्जा वाढविणे ही आहे.

विकिपीडिया आशियाई समाजातील मैत्रीचा एक भाग म्हणून, सहभाग घेणाऱ्यास, जो किमान ५ लेख निर्माणाचा निकष पूर्ण करील त्यास,इतर सहभागी देशांकडून,विशेषत्वाने आरेखन केलेले विकिपीडिया पोस्टकार्ड मिळेल.

जे विकिपीडियन जास्त लेख निर्माण करतील त्यांना "विकिपीडिया आशियाई राजदूत" म्हणून सन्मान दिल्या जाईल.

दुरुस्त वाक्ये : नोव्हेंबर २०१५ मध्ये मराठी विकिपीडियावर 'विकिपीडिया आशियाई महिना' नावाची संपादन-शर्यत होणार आहे. विकिपीडियाशी संबंध असलेल्या आशियाई समाजांमध्ये सामंजस्य वाढविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या महिन्यात, शर्यतीत भाग घेणाऱ्याकडून, आपल्या भाषेतील विकिपीडियामध्ये इतर आशियाई देशांमधील लेखांबद्दल लिहून, एकूण लेखांची संख्या व त्यांचा दर्जा वाढविला जाण्याची अपेक्षा आहे.

विकिपीडिया आशियाई समाजातील मैत्रीचा एक भाग म्हणून, जो किमान ५ लेख निर्माण करण्याचा निकष पूर्ण करील त्यास, इतर सहभागी देशांकडून, वॅशिष्ट्यपूर्ण आरेखन असलेले विकिपीडिया पोस्टकार्ड मिळेल.

जे विकिपीडियन जास्त लेख तयार करतील त्यांना "विकिपीडिया आशियाई राजदूत" हा सन्मान दिला जाईल.

.... (चर्चा) १७:४१, ६ नोव्हेंबर २०१५ (IST)[reply]