Jump to content

विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/हवे असलेले कळफलक बदल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Key(/s) pressed Current character printed by Narayam IME Expected character to be printed Status/Bug no.
G ग्ग् ङ् Bug still not filed
Y य्य् ञ् Bug still not filed
EM ॲं अँ Bug still not filed
Key(s) Narayam
ng
nj ञ् च्या एवजी साधा पाहीजे  ?
aMM अँ

ng = ङ ,nj = ञ् हा वापर नैसर्गीक टायपींग ला ओके आहे, न्ग आणि न्ज चा मराठी तील कमी वापर पहाता त्यांना एडीट टूल मधून उपलब्ध ठेवता येईल. कॅपीटल Y जेंना जसे जर्मन अक्षरे जोडून दाखवण्या करता उपलब्ध ठेवता येईल.

या कळी उपलब्ध आहेत

[संपादन]

अक्षरांतरण मध्ये अद्याप कॅपीटल Q F वापर झालेला नाही. कॅपीटल ZX सध्या झ् आणि क्ष् अक्षर देतात ती अक्षरे स्मॉल लेटरला पण मिळतात त्या अर्थाने हि लेटर्सही काही नवे बदल इनकॉर्पोरेट करण्यास उपयूक्त ठरू शकतात.

शुद्धमाती यांचाही उल्लेख असावा

[संपादन]

जेंच्याप्रमाणे शुद्धमाती (Shuddhamati) यांनाही कळफलकावर बदल हवे आहेत. दोघाही सदस्यांनी सुचविलेले काही बदल सारखेच असले तरी जेंच्याप्रमाणे शुद्धमाती यांच्याही नावाचा येथे उल्लेख करणे प्रचालकीय गरिमेस शोभून राहील. --संतोष दहिवळ (चर्चा) २३:१५, १४ जुलै २०१३ (IST)[reply]

:) आपण सदस्यांच्या नामोल्लेखा संदर्भाने जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद. Shuddhamati >>हे शुद्धमती का शुद्धमाती ( शुद्धमाती हा शब्दही चांगलाच आहे , पण रोमन लिपीतून लिहिणाऱ्यास काय अभिप्रेत आहे  ? ); रोमन लिपी मराठी(भारतीय) भाषेस संभ्रमाची अवस्था निर्माण करते आणि न्याय देण्यात कमी पडते ती अशी. शुद्धमती (अथवा शुद्धमाती) यांचा सुद्धा नामोल्लेख करूयात माझी हरकत नाही. :)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३८, १५ जुलै २०१३ (IST)[reply]

वाचकास वेगवेगळ्या फाँटाचे स्वरूप युनिकोड वापरूनच दाखवण्याची काही तांत्रीक सुविधा उपलब्ध आहे ?

[संपादन]

वाचकाचा एक फाँट असताना, त्यास एखाद्या उदाहरणातील त्याच अक्षराच्या दुसऱ्या फाँट स्वरूप नेमके कसे दाखवावे ? मला वाटते या करता काही ना काही व्यवस्था विकिपीडियावर उपलब्ध असेल कुणी माहिती मिळवून दिल्यास बरे पडेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३७, १५ जुलै २०१३ (IST)[reply]

विकिपीडियावर अशी सुविधा आहे की नाही माहित नाही पण फायरफॉक्सच्या माध्यमातून web console वर अशी सुविधा आहे. --संतोष दहिवळ (चर्चा) ०९:५९, १५ जुलै २०१३ (IST)[reply]

श्र हे जोडाक्षर आहे, शृ नाही.

[संपादन]

'श'ला एक शेपटा आहे. 'श'च्या स्वरदंडाला तिरप्या रेघेने 'र' जोडायचा प्रयत्न केला की ती तिरपी रेघ 'श'च्या शेपट्याला चिकटण्याची शक्यता असते. असे झाले तर एक विचित्र अक्षर तयार होईल. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी असल्या कामासाठी एका वेगळ्या 'श'ची निर्मिती केली. त्या 'श'ला काना, मात्रा, उकार, वेलांटी, ऋकार लावता येतात आणि र. ल, व, म, न ही अक्षरेही सहज जोडता येतात. या नव्या 'श'ला शेपटा नसल्याने अक्षरे जोडताना शेपट्याचा अडथळा होत नाही. त्यामुळे श्र, श्रा. श्रि. श्री, श्रु, श्रू, श्रे, शृ, श्व, श्न(श+न), वगैरे अक्षरे सहज बनतात.

इ-ई, झ, र, स, ह आणि क्ष यांनाही शेपटे आहेत. पण इ-ई, र, यांना तिरप्या रेघेचा 'र' लावायची गरज नसते, 'क्ष', 'झ' आणि 'स' या अक्षरांना मध्ये दांडा असल्याने जोडलेला तिरप्या रेघेचा 'र'चा, शेपट्यांना स्पर्श होण्याची शक्यता कमी असते. आणि 'ह'ला एक वाटी असल्याने त्या वाटीत तिरप्या रेघेचा 'र' सहज बसतो.

यावरून श्र किंवा शृ मधला हा खास 'श' 'तसा' असणे किती जरुरीचे होते ते लक्षात यावे. हा खास 'श' कळफलकावर हवा. 'श्र'चे असण्याची अजिबात गरज नाही.

'श्र'चे शब्द : श्रम(परिश्रम, आश्रम, सश्रम, विश्राम), श्रद्धा(अश्रद्ध, सश्रद्ध), विश्रब्ध, श्रमण, श्रमणक, मिश्र(मिश्रित, मिश्रण, संमिश्र, व्यामिश्र), आश्रय(आश्रित, आश्रयदाता, आश्रयस्थान), श्रवण, श्रांत(अविश्रांत, विश्रांती), श्राद्ध, श्राप (अश्राप), मेश्राम, श्रावण, श्राव्य(सुश्राव्य), श्रावस्ती, श्री, श्रीकांत, श्रीकृष्ण, श्रीधर, श्रीनिवास, श्रीमती, श्रीमान, श्रीमुख, श्रीयुत, श्रीलंका, श्रीवर्धन, श्रुजबरी, श्रुत, श्रुती, अश्रू(अश्रुपात, नयनाश्रू, साश्रुनयन), मश्रूम, शुश्रूषा, श्रेणी, श्रेय(श्रेयस, श्रेयस्कर), श्रोणी, श्रोता, श्रोतृगण, श्रोतृवृंद, श्रौतसूत्रे, वगैरे.

'शृ'चे शब्द : शृंगार(शृंगारिक, शृंगारसाधने, शृंगारपेटी), शृगाल, शृंगी, चतु:शृंगी, सप्तशृंगी, हृष्यशृंग, वगैरे.........J (चर्चा) ००:४५, १९ जुलै २०१३ (IST)[reply]

नमस्कार ,
" शृ " हे साध्या सरळ अक्षरांतरणास जमणारे युनिकोडात उपलब्ध असलेले अक्षररूप, इन्स्क्रिप्ट कळफलकात (शिफ्ट+८= श्र) + (= चे चिन्ह बरोबर ृ ‌‌‌‌‌‌) = श्रृ असा चुकीचा उपद्व्याप एवढा प्रदीर्घ काळ कसा करते आहे हे आश्चर्य आहे.आपण म्हणालेले शचे दुसरे फाँट रूप युनिकोडात सुरवातीस उपलब्ध नसावे, तिरप्या रेषेचा आणि डोक्यावरचे रफारही आधीच्या जुन्याकळफलक चित्रात नाहीत पण ३ आणी ४ क्रमांक शिफ्ट सहीत दाबल्यास ्र र् हे अनुक्रमे क्र आणि र्क बनवतात हे शिफ्ट+८= श्र कळफलकावर देण्याच्या काळात नसावेत त्यामुळे सबंध श्र त्या काळात द्यावा लागला असेल असा अंदाजा बांधता येतो. ज्या अर्थी हि समस्या आता युनिकोडात नाही तेव्हा इन्स्क्रिप्ट कळफलक बनवणाऱ्यांनी हा बदल करावयास होता आणि बहुधा ही जबाबदारि सिडॅकची असावी. त्यांनी हे सोपे काम अद्याप का केले नसावे याचे आश्चर्य वाटते. आपले काही सदस्य सिडॅकच्या संपर्कात असतात त्यांच्या कानावर घालूयात शिवाय 'युनिव्हर्सल लॅंग्वेज सलेक्टर'च्या विकि पातळीवर स्थानीक बदल करून घेता आला तर पाहूयात.


पण मला दोन संबंधीत प्रश्न पडले एक मला श्रृ हे अशुद्धलेखन मराठी विकिपीडियावर फारसे आढळले नाही कदाचित तुम्ही ते जातीने दुरुस्त करत असल्यामुळे शक्य आहे.पण आपल्याकडची इन्स्क्रिप्ट वापरणारी मंडळी शृ ट्र् इत्यादी लिहिणे विनातक्रार कसे साध्यकरत आहेत हे समजले नाही . हे एवढ्याकरता समजून घ्यावयाचे की इन्स्क्रीप्ट वापरु इच्छित नवागतांना सहज मार्गदर्शन जोडता येईल.
  • ताक.
संगणकावर अक्षरचित्रे कशी काढावित ही आपल्यापुढील समस्या अद्याप सुटलेली दिसत नाही,त्यामुळे वर्णन लिहिण्यात बराच वेळ आणि श्रम कामी लागत असणार.कूणा ओळखीच्या संगणक मित्राकडून माहिती करून घेतल्यास आपले काम सोपे होईल असे वाटते.
ओ सॉरी M श + = ृ चे चिन्ह =शृ इन्स्क्रिप्ट वर बरोबर येतो मग केवळ चुकलेली तुरळक मंडळीच श्रृ अशी चूक करत असणार. श्रीलंका, श्रीवर्धन, श्रुजबरी, श्रुत, श्रुती, अश्रू हि जी श्रची इतर रूपे आहेत ती टंकण्यात श्र कळफलकावर असल्यामुळे टंकण्यातला वेळ वाचत असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर तसे असेल तर कळ फलकावर श्रचे अस्तीत्व बरोवर ठरते किंवा कसे  ?


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:३२, १९ जुलै २०१३ (IST)[reply]