विकिपीडिया चर्चा:चरित्र प्रकल्प/चालू कामे
Appearance
मार्गदर्शन करावे
[संपादन]नमस्कार,
आपण मागविल्या प्रमाणे मी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करीत आहो पाच राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे काम संपवले पण आहे परंतु मी सध्या वापरात असलेल्या साच्यात (सिनेटर साचा हाच साचा ओबामा साठी वापरलेला होता म्हणून मी पण तोच पुढेही वापरला)मर्यादा आहेत जसे मृत्यू स्थान व तारीख आदी, आपण ह्या करिता योग्य साचा सुचवावा अथवा असलेल्या साच्यात सुधारणा कराव्यात किंवा कसे, कुपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद ..! (१८:४४, ६ मे २०११ )
राहुल देशमुख ०३:५०, १८ जून २०११ (UTC)
- राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान वगैरेंसाठीचा माहितीचौकट साचा साचा:माहितीचौकट पदाधिकारी हा बनवायचा प्रयत्न मागे एक प्रचालक सुभाष राऊत यांनी केला होता. मात्र त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. खेरीज तो साचाच एवढा अवाढव्य आणि जटिल आहे, की त्यातील त्रुटी सुधारायला व्यवस्थित वेळ काढून मेहनत घ्यावी लागेल.. जी मला किंवा अन्य काही अनुभवी साचे-निर्मितीत अनुभवी असलेल्या सदस्यांना प्रत्यक्षात जुळवून आणणे जमले नाही. त्यामुळे तूर्तास माहितीचौकटींच्या फंदात न पडता त्या लेखांमध्ये चित्रे व प्रत्येक अध्यक्षाबद्दल संक्षिप्त आढावा म्हणण्यालायक ५-६ वाक्यांची / १-२ परिच्छेदांएवढी माहिती भरणे व त्यानंतर कॉमन्स व बाह्य दुव्यांची नोंद करणे (मराठी/इंग्लिश/अन्य भाषक दुव्यांची मराठीत लिहिलेली नोंद करणे अपेक्षित आहे.) इतपत सीमित उद्दिष्ट गाठायचे आहे.
- फोर्ड, कार्टर, रेगन, जॉर्ज एच.डब्ल्यु. बुश, क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश हे लेख या निकषात बसण्याइतपत दर्जेदार करण्याचे काम बाकी असल्याने ते लेख अजूनही काम बाकी रकान्यातच ठेवत आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१३, १९ जून २०११ (UTC)