विकिपीडिया:१मे २०१८
मराठी विकिपीडिया हा स्वयंसेवकांच्या मदतीने चालणारा मुक्तस्त्रोत ज्ञानकोश आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या सर्वात जास्त सक्रिय सदस्यांचे अनुभव आपल्यासमोर मांडत आहोत.
टायवीन गोन्साल्वीस
[संपादन]मराठी विकिपीडिया आज १५ वर्ष पूर्ण करतो. पहिला लेख वसंत पंचमीच्या निर्मिती नंतर १५ वर्षाच्या मोठ्या काळापर्यंत मराठी विकिपीडिया अजूनही अशा स्थानाच्या रूपात उभा आहे, जिथे लोक आपल्या ज्ञान योगदान देतात आणि एक विश्वकोश डाटाबेस तयार करतात. मला जिमी वेल्सच्या शब्दांची आठवण आहे जेव्हा त्याने म्हटले आहे, "जगाची अशी कल्पना करा ज्यामध्ये ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी ज्ञानाच्या योगदानापर्यंत मुक्त प्रवेश दिला जातो. आम्ही हे करत आहोत." मराठी विकिपीडियाने नुकतीच ५१,००० लेखांची संख्या पार केली आहे आणि अद्याप ती वाढतच आहे. प्रचालकांना खूप धन्यवाद जे नेहमीच याला मजबूत ठेवण्यासाठी येथे राहिले आहेत. या विकीवरील ३,१९,२९३ पृष्ठांचे योगदान दिलेल्या १,६७,४६५ नोंदणीकृत सदस्यांनाही खूप धन्यवाद. अलीकडील काळात प्रचंड प्रगती झाली आहे आणि आम्ही भविष्यासाठी एक मजबूत आधार तयार केला आहे. या महाराष्ट्र दिनी आपण मराठीला आपल्या आयुष्याचा पाया बनवूया. V.narsikar यांचे शब्द लक्षात ठेवा माता आणि मातृभाषा या दोन गोष्टी जगामध्ये आपली ओळख निर्माण करण्यास मदत करतात
याबरोबर मी माझे शब्द संपवत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा विकिपीडिया, कामगार दिनाच्या शुभेच्छा, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
Tiven2240, मुंबई. प्रचालक, सदस्य १२ सप्टेंबर २०१६ पासून
सुरेश खोले
[संपादन]मराठी विकीवर मी जरी गेली सहा/सात वर्षे असलो तरीही मी कमी अधीक फ़रकाने येत-जात राहिलो. त्याचे कारण अर्थातच येथे निर्माण झालेले गढूळ आणि हेकेखोरपणाचे वातावरण होते, शेवटी त्या वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल झाल्यामूळे. गेले काही महिने मी सतत संपादने आणि प्रत्यक्षात काही कार्याशाळा घेणे, विकीवर ध्येय-धोरणे आणण्यात सहभाग देणे, तांत्रिक बाबींवर प्रगतीसाठी प्रयत्न करणे इ. बाबींमध्ये माझा सहभाग नोंदवत आहे. मला या पुढेही सर्वांच्या सहकार्याने अनेक आवश्यक ती धोरणे आणि तांत्रिक बाबीं जसे की अवजारे, बॉट्स, भाषांतरे इ. आणायची आहेत. माझा उद्देश संख्यांवर नसून मजकूराच्या गुणवत्तेवर आहे, त्यामुळे आत्तापर्यंत मी संदर्भ देणे सोपे करणे, नकल-डकव शोधून काढणे, वर्गीकरणे, नविन सदस्यांना प्रोत्साहन देणे, इत्यादी कामांत सहभाग देत आहे आणि यापुढेही माझा सहभाग वाढत्या क्रमाने चालुच राहिल.
WikiSuresh, पुणे. सदस्य २५ सप्टेंबर २०१० पासून
संदेश हिवाळे
[संपादन]मराठी विकिपीडियाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तसेच मराठी विकिपीडियाला सतत वरच्या पातळीवर नेत असणाऱ्या तमाम मराठी सदस्यांचे (विशेषत: सक्रिय) मनपुर्वक आभार व शुभेच्छा.
सुरुवातीला मला मराठी विकिपीडिया बद्दल काहीच नव्हते पण जेव्हा मोबाईल फोन माझ्या हाती आला, तेव्हा मी मराठी विकिपीडियावरील लेख वाचायला लागलो. काही सुंदर सुंदर लेख तर काही उणिवा असणारे लेख दिसले. या सुधारासाठी मी विकिपीडियात शिरलो व सध्या मी सर्वाधिक सक्रिय सदस्य आहे. मी या मराठी विकिपीडियामधून खूप काही शिकलो आहे शिकत आहे, ज्याचा उपयोग मी माझ्या वैयक्तिक जीवनात करत असतो. या माध्यमातून अनेक चांगल्या व्यक्तींशी परिचय सुद्धा झाले.
मराठी विकिवर अनेक लेख आहेत व अनेक लेख असणे बाकी आहे. सर्वांच्या सामूहिक योगदानातूनच हे काम हळूहळू पूर्णत्वाकडे जात राहिल. यासाठी आवश्यक ती धोरणे, तांत्रिक बाबी व इतर काही उपयुक्त असे कामे विकिवर राबवली जावीत.
संदेश हिवाळे जालना. सदस्य १२ जुलै २०१६ पासून
आर्या जोशी
[संपादन]मराठी विकिपीडियाला मन:पूर्वक शुभेच्छा! आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला जितक्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो तशाच या ही आहेत. मी दोन वर्षांपासून सक्रिय संपादक या नात्याने काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करते आहे. ज्ञानकोश समृद्ध करण्यात हातभार लावताना अभ्यासक म्हणून मीही समृद्ध होत गेले. नवे विषय समजले, नवीन माणसे जोडली गेली. या व्यासपीठामुळे जगभरातील विविध लोक संपर्कात आले. माझे जग विस्तारले. समाजाला ज्ञान मिळविण्यात सहकार्य करणारे हे माध्यम अधिक समृद्ध व्हावे अशी शुभेच्छा! येथे प्रत्येक गोष्ट ही पारदर्शी आहे आणि ती सर्वाना समजते त्यामुळे काम करण्याचा मोकळेपणा जाणवतो हे याचे बलस्थान आहे. Assuming good faith हा विचार मी या निमित्ताने व्यक्तिगत आयुष्यातही वापरायला शिकले ते इथूनच. हे व्यासपीठ अधिक समृद्ध व्हावे आणि अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा अशी आशा प्रकट करते. वाढदिवसाला काही ना काही संकल्प करायचा असतो आणि तो पाळायचा प्रयत्नही करायचा असतो अस संस्कृती सांगते. आपण सर्वजण मिळून या व्यासपीठाची गुणवत्ता वाढविण्याचा सामूहिक प्रयत्न या औचित्याने करूया असे सुचविते. धन्यवाद!
आर्या जोशी, पुणे. सदस्य १२ मे २०१६ पासून
प्रसाद साळवे
[संपादन]महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना मनपूर्वक शुभेछ्या
मराठी विकिपीडिया सध्या वेगाने वाढणारा माहितीचा खजिना आहे. मला मराठी विकिपीडिया समूहाचा सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलीकडच्या काळात मराठी विकिपीडियाचा पुरोगामी दृष्टीकोन वाढत असल्याचे पाहून मन आनंदित होते. अधिक संख्येने प्रचालक असावेत म्हणजे विकिपीडिया चा दर्जा अधिकच सुधारेल. तसेच तांत्रिक ज्ञानाच्या प्रात्यक्षिक अध्यापनाच्या कार्यशाळा वारंवार व्हाव्यात. म्हणजे विकीनीती सर्वच्या अल्प काळात लक्षात येईल.
महाराष्ट्र दिनाच्या व विकी वर्धापन दिनाच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
प्रसाद साळवे बीड, औरंगाबाद सदस्य २१ ऑगस्ट २०१२ पासून