विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/18
Appearance
- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- एकदा संदर्भ दिला म्हणजे, इतरत्रची माहिती जशीच्या तशी लिहिली किंवा कॉपीपेस्ट केली तर चालते असे नव्हे.जसेच्या तसे लिहिण्याने/कॉपीपेस्ट करण्याने प्रताधिकार भंग कॉपीराईट कायद्याचा भंग होतोच.त्याकरता इतरत्रच्या माहितीतील केवळ तथ्य (facts) तेवढीच लक्षातघेऊन त्या अनुरूप माहिती स्वत:च्याच शब्दात लिहा.इतर स्रोतातील इतरांच्या लेखनाची लेखन शैली/मांडणीची कॉपी/वर्णनात्मकता/रंजकता/विशेषणे कॉपी करणे टाळा.
- स्वत:च्या शब्दात लिहिणे म्हणजे स्वत:चे व्यक्तीगत मत मांडणे नव्हे,माहितीतील केवळ तथ्य (facts) दुसऱ्यांनी उल्लेखकेलेले;शब्द मात्र स्वत:चेच !
- आणि मुख्य म्हणजे लेखन स्वत:च्या शब्दात केले तरी, संबंधीत माहिती असलेल्या, त्रयस्थ स्रोताचा संदर्भही आवर्जून नमुद करा.