विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/12
Appearance
- एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
- संदर्भ हा सत्य असावा तसेच संदर्भित विधानाची सत्यता पटवणारा असावा. "सदाशिव पाटील अरबी समुद्र पोहून गेला." या विधानाला संदर्भ देण्यासाठी नुसता अरबी समुद्राविषयीचा संदर्भ देउन उपयोग नाही. जर,त्या संदर्भात, "सदाशिव समुद्र पोहून गेल्याचा उल्लेख" असेल तरच हा संदर्भ योग्य ठरतो. तसेच नुसता सदाशिव पाटीलबद्दलचे पुस्तक, लेख किंवा दुवा संदर्भ म्हणून देउनही उपयोग नाही. जर "त्या पुस्तकात, लेखात किंवा दुव्यावरील पानावर सदाशिव पाटील अरबी समुद्र पोहून गेल्याचा उल्लेख असेल" तर तो संदर्भ योग्य ठरतो.