Jump to content

विकिपीडिया:विकिम्याऊ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिम्याऊ म्हणजे असे सदस्य जे लहान लहान संपादने करतात आणि त्यातूनच पुढे येतात, पुष्कळवेळा ते खुप लहान म्हणजे शुद्धलेखने तपासणे, दुवे जोडणे, कलमे जोडणे अशा सुधारणा करताना आपल्याला दिसतात. या म्याऊची संपादने अनेकदा गोंधळ किंवा उत्पात म्हणून पाहिली जातात. पण ती तपासल्यावर लक्षात येते की, ती उपयोगाची संपादने आहेत. ह्या विकिम्याऊला चांगल्या सदस्यांमध्ये घडवण्यासाठी मार्गदर्शन आणि पाठींब्याची गरज असते. या म्याऊची सद्भावना गृहित धरण्यावरच सगळी भिस्त असते. या म्याऊ खूप मानभावी असतात, त्यामुळे थोड्याश्या रागाने किंवा हटकल्याने त्या दूर जाण्याची किंवा कायमच्या पळून जाण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे ह्या सदस्यांशी प्रेमाने वागा, कायम सद्भावना गृहीत धरा आणि मगच ही विकिम्याऊ आपली होईल आणि एक दिवस विकिवाघोबा किंवा विकिचित्ता होईल.

चित्रदालन

[संपादन]

साचा

[संपादन]

जर तुम्ही‌ विकिम्याऊ आहात अशी तुमची ओळख तुम्हांला करुन द्यायची असेल तर तुमच्या सदस्यपानावर हा साचा लावा. जेणेकरुन इतर सदस्य आणि प्रचालक तुमच्याशी योग्यप्रकारे वागतील.