विकिपीडिया:विकिमीडियाचा भारतीय स्कन्ध
विकिमिडीयाचा भारतीय स्कन्ध (विकिमिडीया इंडिया चॅप्टर) हि विकिमिडीया फाऊंडेशनच्या प्रकल्पांना भारतात प्रमोट करणारी भारतीय स्वायत्त ना-नफा संस्था आहे. विकिमिडीया फाऊंडेशनचे देशपरत्वे स्थानिक पातळीवर कायदेशीर दृष्ट्या स्वायत्त संस्था स्वरुपात स्कन्ध (चॅप्टर) असतात. ज्यांचा विकिमिडीया फाऊंडेशनशी संलग्नतेसाठी करार झालेला असतो.
विकिमिडीयाचे स्कन्ध (चॅप्टर) विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांबाबत संपादकीय नियंत्रण नसते,विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांबाबत निती निर्णय घेत नाहीत , किंवा विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांबाबत जबाबदार नसतात. विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांचे निती आणि मजकुर निर्णय प्रत्येक भाषीय प्रकल्प ऑनलाईन सहमतीतून स्वायत्तपणे घेत असतो. विकिमिडीयाचे स्कन्ध (चॅप्टर) संस्थात्मक पातळीवर केवळ विकिप्रकल्पांचा प्रचार, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रादेशिक मेळावा, अशा स्वरुपाचे अनुषंगिक काम असते. विकिमिडीयाचे स्कन्धाचे विकिमिडीया फाऊंडेशन च्या वेबसाईट्स अथवा विदादात्यांवर (सर्वरवर) नियंत्रण नसते.
विकिमिडीयाचा भारतीय स्कन्धाचे मुख्य ठाणे बेंगलोर येथे आहे. विकिमिडीयाच्या भारतीय स्कन्धाची स्थापना ३ जानेवारी २०११ रोजी झाली. [१]
सभासदत्व
[संपादन]विकिमिडीयाच्या भारतीय स्कन्धाचे सभासदत्व १८ वर्षेपूर्ण झालेल्या कोणत्याही भारतीय नागरीकास अथवा भारतात पंजीकृत संस्थेस घेता येते. एक वर्षासाठी असते त्याचे नुतनीकरण दरवर्षी करावे लागते.[२]
कार्यकारी समिती
[संपादन]अर्जुन राव चावला हे प्रथम संस्थापनवर्षातील अध्यक्ष होते त्यांच्या नंतर, सुधन्वा जोगळेकर, मोक्ष जुनेजा, जयंत नाथ, यांनी अध्यक्षपदाची धूरा सांभाळली. सर्वश्री राहुल देशमुख हे जुलै २०१७ पासून सध्याचे अध्यक्ष म्हणून धूरा सांभाळत आहेत.[३]
कार्यकारी समितीवर नियूक्त व्यक्ती अधिकतम दोन टर्मससाठी निवडून येऊ शकते.[४]
विकिमिडीयाचा भारतीय स्कन्धाने आत्तापर्यंत केलेले कार्य
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |