विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२१
Appearance
लघुपथ: WP:WAM 2021
नियम
[संपादन]थोडक्यात: नवीन लेख हा आशिया खंडातील देशांतील विषयांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट आकाराचा, २०२१च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा; आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.
- हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०२१ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३० , २०२१ ०५:०० (UTC) स्वतः बनवलेला असला पाहिजे.
- सदर लेख किमान ३००० बाईट आकाराचा आणि किमान ३०० शब्दांचा असावा. (महितीचौकट, साचे सोडून)
- सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
- लेख पुर्णतः मशीन रूपांतरित नसावा व भाषा शुद्ध असली पाहिजे.
- लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उदा. कॉपीराईट उल्लंघन, उल्लेखनियता स्पष्ट असावी)
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
- सदर लेख मराठी भाषेत लिहिलेला असावा पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांतील विषयांवर असावा.
- स्पर्धा आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
- स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे मराठी भाषेतील परीक्षक निर्धारित करतील.
- जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे किमान ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून WAM पोस्टकार्ड मिळेल.
- तुम्ही 'विकिपीडिया आशियाई दूत' घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.
या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.
संदर्भ दुवे
[संपादन]आयोजक
[संपादन]साइन अप
[संपादन]या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करा (साइन अप करा) आणि तुमचे योगदान द्या.
लेख सादर करा
[संपादन]एकदा तुम्ही तुमचे लेख तयार केल्यानंतर, कृपया खाली क्लिक करून फाउंटन टूलद्वारे लेख सबमिट करा.


