Jump to content

विकिपीडिया:विकिपीडियाला तुमची गरज नाही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • तुम्हांला विकिपीडियाची जास्त गरज आहे आणि हे वास्तव आहे. हे आकडेवारीही सांगते आणि धडधडीत वास्तव आहे की, तुम्हांला विकिची गरज आहे. जर तुम्ही खूप भाव खात असाल तर विकिला तुमची‌ नक्कीच गरज नाही. इथे तुमची‌ गरज आहे, तुमचे योगदान, तुमचा वावर इथे आवश्यक आहे, तुम्ही‌ इथे खाते उघडणे गरजेचे आहे, इथल्या लेखांवर तुम्ही काम करायची गरज आहे, शुद्धलेखन तपासायची गरज आहे, संदर्भ द्यायची गरज आहे, पण तरीही‌ विकिपीडियाला तुमची गरज नाही. इथे लेखन शैलीनूसार लेख लिहिले जावेत, संदर्भाच्या याद्या भरल्या जाव्यात, चर्चापानांवर प्रकल्पांची नावे जोडली जावीत, प्रचालकांच्या विनंतीवर किंवा चावडीवर होणाऱ्या चर्चांमध्ये तुम्ही केलेले वेडे विनोद हवे आहेत. पण तरीही विकिपीडियाला तुमची गरज नाही.
  • एखादा दिवस असाही येईल जिथे प्रशासक/प्रचालक यांची चर्चा होईल, त्यातून तुमच्या चुका उघडकीला येतील आणि तुम्हांला कायमचे तडीपार करण्यात येईल. तरीही‌ लक्षात ठेवा, जग तसेच चालू राहील, तुमच्या घरासमोरच्या माळावरच गवत तसेच वाढेल, शेजारच्या झाडावरचे पक्षी तसेच चिवचिवाट करत रहातील, त्यांच्या घरट्यांमधे अंडीही देतील, पोकेमोन बद्दलचे लेख आठवड्याला दुप्पट वेगाने लिहिले जातील, आ‌‌णि अनेक लेख काढूनही टाकले जातील, आता हे सगळे तुम्ही असताना जसे केले होते त्या शिताफ़ीने आणि कौशल्याने कदाचित होणार नाही, पण होईलच. आणि विकिपीडिया तसाच चालू राहील, हो तुम्ही नसताना सुद्धा!!! हे खूपच वाईट आहे पण वास्तव आहे
  • जर विकिवरची भांडणे खूपच त्रासदायक असतील, तुम्ही‌ खूप ताणात असाल, तर चक्क विकिसुट्टी घ्या, किंवा विकिपीडिया सोडून द्या. वास्तविक सोडून देणे खूपच वाईट होईल, पण तुम्ही गेलात तरीही उद्या विकिपीडिया इथे असणारच आहे, विकिपीडिया माझ्यापेक्षा, तुमच्यापेक्षा, अगदी जिंम्बो वेल्सपेक्षाही मोठा आहे. त्यामुळे तुम्हांला असे वाटत असेल की, ह्या प्रकल्पाला तुमची गरज आहे म्हणून तुम्हांला कोणी हात लावणार नाही? लक्षात ठेवा तुमची गरज नाही,

खरेतर एक कप चहाने तुमच्या इथल्या अनेक समस्या सुटणार आहेत, आणि मग हवे तर विकि आणि तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकाल.