Jump to content

विकिपीडिया:लॉगआऊट करताना/18

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिकित्सामक विचारकर्त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे ते अनिश्चितता हाताळू शकतात.चिकित्सामक विचारकर्ता, आपल्याला कोणत्या भागाबद्दल 'काय माहित नाही', हे माहित करून घेण्यास प्राधान्य देतो.चिकित्सामक विचारकर्ते ग्राह्य पुराव्यांकरता आणि ग्राह्य पुराव्यांवर आधारीत उत्तराची वाट पहाण्याची तयारी ठेवतात.चिकित्सामक विचारकर्ते जिज्ञासूपणा,दृष्टीकोण व्यापक करण्याची आणि आपल्या ज्ञानाचा परीघ विस्तारण्याची उत्कंठा जोपासतात.संबंधीत विषयाबद्दल योग्य माहिती करून घेण्याच्या दिशेने कार्यरत असतात.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)


  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.