विकिपीडिया:लॉगआऊट करताना/17
चुकीच्या दुभाजनाची निष्पत्ती चुकीच्या निष्कर्षात होते. 'जर पर्याय 'अ' चुकीचा असेल तर पर्याय 'ब' बरोबर असलाच पाहीजे.' ;एखाद्याचा दृष्टीकोण 'क्ष' नसेल तर तो 'ज्ञ' असलाच पाहीजे.
केवळ काळ्या किंवा पांढर्या दोनच रंगांशिवाय इतर पर्याय विचारात घेण्याबद्दल अनिच्छा अथवा नकारार्थी दृष्टीकोणामागे बहूधा, समस्येस निश्चित एकमेव उत्तरांचा अभाव, आणि समस्येतून उद्भवणारी अनिश्चित संदीग्ध स्थिती हाताळण्यातील अक्षमता, ही संभाव्य कारणे असतात.एखादी गोष्ट स्पष्ट अथवा माहित नसण्यातून, येणारी संदीग्धता अथवा अनिश्चितीते बद्दल असंयम, (उणीवयुक्त) निष्कर्शाप्रत पोहोचण्याची घाई, हि सत्याप्रती असलेल्या उत्सुकतेचा भाग नसून, कम्फर्ट हवी असल्याने हा उताविळपणा घडतो.
-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)
- विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.