विकिपीडिया:लॉगआऊट करताना/14

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपल्यात संगोपनातून आणि संस्कृतीतून आपल्या विचारसरणीत अंगिकारले गेलेले कल(बायस) लक्षात घेऊन ते कमीत कमी करण्यासाठी, आपल्यात, विचार करण्यात अधिक चांगला असण्याची इच्छा आणि इच्छाशक्ती असणे आवश्यक असते.

मनात बाळगलेले पुर्वापार विश्वास नाकारले जाणार असतील, तरी त्याची तयारी ठेवत, वस्तुस्थितीशी मेळ खाणारे पुरावे आणि ज्ञान मिळवणे, आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्याची तयारी असली पाहीजे.वस्तुस्थितीशी मेळ खाणार्‍या पुराव्यांनी आणि ज्ञानाने, आपले विश्वास निराधार असल्याचे सिद्ध केले तर, वस्तुस्थितीतील फरक स्विकारणे हीच योग्य प्रतिक्रीया ठरते.-क्रिटीकल थिंकींग हे युट्यूब सादरीकरण पहा (इंग्रजी) अथवा (चिकित्सामक विचार कसा करावा? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)


  • विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवर, तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात.विकिपीडिया अधिकाधिक तर्क सुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.