विकिपीडिया:लेखांना समस्यांसाठी साचे लावणे

लघुपथ: विपी:साचे
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"साचे" अनेकदा लेखातील समस्या दाखवण्यासाठी वापरले जातात. अनेक अनुभवी सदस्य अशाप्रकारे लेखातील समस्या साचे लावून दाखवण्यापेक्षा ते स्वत:च सुधारण्याकडे जास्त रस घेताना दिसतात. पण नुसते साचे लावून लेखातील समस्या समोर आणणेही तितकेच महत्त्वाचे आहे. साच्यांमुळे लेखातील समस्या समोर येतात, संपादकांना समस्या लक्षात येतात तसेच वाचकांना त्या लेखातील मजकूराविषयी आणि त्याच्या विश्वासार्हतेविषयी स्पष्ट माहिती मिळते. असे नक्कीच अपेक्षित आहे की संपादक सदस्यांनी स्वत:च मजकूरात बदल करणे अपेक्षित आहे, परंतू नेहमीच तसे शक्य होईल असे नाही तेव्हा जर संपादकांनी साचे लावून इतरांना ते सुचित केले तरी ते खूप उपयोगाचे होणार आहे. अनेक वेळा साचे लावताना त्याचे कारण संपादन सारांश किंवा चर्चापानावर द्यावे, जेणेकरून त्या पानात सुधारणा करणाऱ्या सदस्यांना साचा समजून घेण्यास मदत होईल.

सभ्य, आदरयुक्त भाषेत आणि आवेशात केलेली सुधारणात्मक टिका ही अनेक जणांनी एकत्र येऊन काम केलेल्या कोणत्याही प्रकल्पास हवीच आहे. विकिपीडियासारख्या प्रकल्पनांना तर ती आणखीनच महत्त्वाची आहे, त्यामुळे अश्या सुधारणात्मक टिकेचा कायमच पुरस्कार केला जावा. अनेकदा वाचकांकडून चर्चापानावर किंवा मुख्य मजकूरातही मजकूराच्या सत्यतेविषयी किंवा आवेशाविषयी मत मांडले जाते, वाचकांना कदाचित त्या लेखात बदल करण्याचे तांत्रिक ज्ञान नसेल पण त्यांचे मजकूराविषयीचे मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या मताचा विचार नक्कीच केला जावा.

सुधारणात्मक साचे लावणे[संपादन]

लेखाच्या सुधारणेची कसलीही जबाबदारी न घेता फक्त साचे लावत लेखानंतर लेख असे पळत जाणे नेहमीच चुकीचे मानले जाईल. शिवाय साचे लावून त्याविषयीचे स्पष्टिकरण न देणे किंवा संपादन सारांशही न देणे हे ही चुकीचे मानले जाईल.

त्याच विरुद्ध, अगदीच स्पष्ट दिसणाऱ्या चुकां आणि समस्या जसे की, इतर भाषांतून यांत्रिक भाषांतराने आणलेला मजकूर, संदर्भहीन लेख, अविश्वकोशीय भाषाशैली, चुकीचे किंवा अर्धवट स्वरूपण, अशा आणि इतर अनेक चुका/समस्यांविषयी साचे लावणे आवश्यक आहे.

साचे काढणे[संपादन]

कोणताही सदस्य ज्यांना साचे दिसतात पण त्या साच्यांचे त्या पानावर असण्याचे कारण स्पष्ट दिसते आणि इतरांना ते संपादन सारांश आणि चर्चापानावर लिहून कळवण्याचे कष्ट घेता येऊ शकतात त्या सर्वांनी साचे असणाचे कारण नसण्याच्या परिस्थीत साचे काढायला हरकत नाही. अनेकदा असे ही असु शकते की, ते साचे चुकून लावले गेलेले असू शकतील परंतू साचे काढताना त्याविषयीचा उल्लेख चर्चापानावर आणि संपादन सारांशामधे नक्कीच करणे आवश्यक आहे.