Jump to content

विकिपीडिया:महिला स्वास्थ्य संदर्भ संसाधने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान राबविले गेले. हे अभियान एका राष्ट्रीय अभियानाचा भाग होते. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या-त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी झाले होते. यानिमित्ताने विविध भारतीय भाषा आणि मराठी विकीवर महिला संपादकांची संख्या वाढावी असाही हेतू आहे. या अभियानाच्या कालावधीत महिला स्वास्थ्यविषयक लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते वर्ग/उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करण्याचे योजले होते. लेख लिहिण्यासाठी आवश्यक अशा संदर्भ संसाधनांची तपशीलात यादीसुद्धा केली गेली. जेणेकरून विश्वसनीय, उचित व योग्य संदर्भ संपादकांना सहज उपलब्ध होऊ शकतील.

संदर्भ संसाधने

[संपादन]

संदर्भ ग्रंथ

[संपादन]

ऑनलाईन संदर्भ दुवे

[संपादन]
  • आरोग्यविद्या - मराठी संकेतस्थळ - ह्या संकेतस्थळावरील सर्व माहिती ब्लोगसदृश्यस्वरुपात लिहिली गेलेली आहे त्यामुळे याचा वापर संदर्भासाठी करता येणार नाही.
  • लैंगिकतेवर बोलू या - मराठी संकेतस्थळ - ह्या संकेतस्थळावरील सर्व माहिती ब्लोगसदृश्यस्वरुपात लिहिली गेलेली आहे त्यामुळे याचा वापर संदर्भासाठी करता येणार नाही. फ़क्त काही भाषांतरीत लेखांना मूळ इंग्रजी लेखांचे किंवा पुस्तकांचे संदर्भ आहेत, त्या संदर्भांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत घेता येईल.
  • सेहत - इंग्रजी संकेतस्थळ - या संस्थेने केलेल्या अभ्यासांचे अहवाल आणि संशोधन प्रबंध नक्कीच उत्तम संदर्भ म्हणून वापरता येतील.
  • आलोचना संसाधन केंद्र - इंग्रजी संकेतस्थळ - जरी प्रत्यक्षात ह्या संस्थेने प्रचंड संशोधनाचे काम केलेले असले तरीही दुर्दैवाने संकेतस्थळावर काहीही उल्लेख नसल्याने जर प्रत्यक्ष जाऊन कुणाला संदर्भ वापराचे असतील तर आलोचना मधे आपल्या विषयासाठी भयंकर मोठा खजीना उपलब्ध आहे.
  • मासूम - इंग्रजी संकेतस्थळ - मासूमनेही अनेक महत्वाची प्रकाशने उपलब्ध केली आहेत त्यापैंकी ही काही आणि काही संशोधन प्रबंधही संदर्भ म्हणून उपयोगात आणता येतील.
  • सर्च,गडचिरोली - इंग्रजी संकेतस्थळ - यावरील आदिवासींच्या आरोग्यावरील, ध्येय धोरणांवरील , इतर विषयावरील संशोधन प्रबंध हे संदर्भ म्हणून वापरता येतील.
  • Museum of Menstruation and Women's Health - इंग्रजी संकेतस्थळ
  • या शिवाय जर आपण स्त्रोत शोधा साचा वापरून एखादा संशोधन प्रबंध किंवा पुस्तक शोधत असाल आणि ते तुम्हांला हवे असल्यास आपण आर्या जोशी किंवा सुरेश खोले यांना संपर्क साधू शकता. यांकडे अनेक संशोधन साहित्यांपर्यंत पोहोचण्याची सोय विकिपीडिया लायब्ररीच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

चित्रे,ध्वनी/चित्रफिती

[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर उपलब्ध असलेली छायाचित्रे.