महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:महाराष्ट्रातील खाद्यप्रकार या पानावरून पुनर्निर्देशित)

मराठी खाद्यप्रकार म्हणजे भारतातील महाराष्ट्र राज्यातील खाद्यप्रकार. स्वयंपाक शैली, परंपरा आणि पाककृती यांचा समावेश त्यात होतो.

पुरणपोळी[संपादन]

PuranPoli

महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. पुरणपोळीत आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे मांडा. हा खापरावर बनवला जातो.

पुरणपोळीबरोबर तूप घातलेली गुळवणी म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानीच असते.

मिसळ पाव[संपादन]

महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोक रहातात. त्यांच्या एकत्रिक जीवनाप्रमाणेच विविध पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो तो म्हणजे मिसळ. महाराष्ट्रात चुलीवरची मिसळ हा एक विशेष पारंपारिक चव असणारा पदार्थ आहे.

MISAL PAV.JPG [१]

वडा पाव[संपादन]

Vada Pav-Indian street food.JPG

उकडलेल्या बटाट्याचे सारण व बेसनाचे कवच एकत्र तळून बटाटावडा तयार केला जातो. हा अतिशय साधा व लवकर तयार होणारा पदार्थ आहे. यातील सर्व पदार्थ लगेच मिळणारे असल्याने बटाटावडा महाराष्ट्रात कोठेही मिळतो. शेंगदाण्याची चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या वडापावला एक वेगळीच चव आणतात.

मोदक[संपादन]

Modak (Steamed).jpg

काही पदार्थ ऋतुनुसार सुद्धा बनतात. आमरस उन्हाळ्यात, पावसाळ्यात उसाच्या रसाची पोळी. काही पदार्थ विशिष्ट सणांसाठी राखीव आहेत. सण व महोत्सव पारंपारिक असतात. त्यावेळचे पदार्थ वेगळे असतात. उदा. मोदक. गणेश चतुर्थीच्या वेळी हे बनवले जातात. नारळ आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळाच्या पिठीचे कवच करून आत भरले जातात. आत भरले जाणाऱ्या पदार्थांना सारण म्हणतात.

याचे गोड आणि तिखट असे दोन प्रकार असतात. नेहमीचे उकडीचे,तळणीचे, सारणाचे गोड मोदक आणि दुसरे रश्श्यातील मोदक/ मोदकाची आमटी.


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]